Tur, Cotton Crop Management Agrowon
कृषी सल्ला

Tur, Cotton Crop : अतिवृष्टीत तूर, कापूस पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

तूर आणि कापूस पिकातील व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या उपाययोजना पाहुयात.

Team Agrowon

सध्या राज्यात सर्वच ठिकाणी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. रब्बी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावासाचे उशीराने आगमन झाल्यामुळे उशीरा पेरणी केलेली तूर (Tur), कापूस (Cotton) ही पिके वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या पिकामध्ये पावसामुळे पाणी साचलेले आहे. अशा परिस्थितीत आहे ती पिके वाचविण्याची आश्यकता आहे. तूर आणि कापूस पिकातील व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या उपाययोजना पाहुयात. 

तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेतात पाणी साठलेले असल्यास अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी झाडे पिवळी पडत असल्यास १ टक्का मायक्रो ग्रेड II  १०० मिली १- लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या व पान व फुलाची जाळी करणाऱ्या म्हणजेच मरुका अळीचा प्रादुर्भाव झाला असल्यास इंडोक्झाकार्ब (१७.८ इसी) ०.७ मिली प्रती लिटर पाणी किंवा एमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) दाणेदार ०.४ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाचा प्रसार कोळी या कीटकामार्फत होतो. कोळी नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यू पी) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी व या प्रमाणात फवारावे. त्यानंतर २० दिवसांनी फेनाझाक्वीन १० इसी  १ मिली प्तति लिटर पाणी या कोळीनाशकाची फवारणी करावी. 

कापूस

काही ठिकाणी कापूस बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यास व जमिनीत वाफसा नसल्यास पिकांची मुळे अकार्यक्षम होतात. त्याकरिता वाफसा आल्यानंतर खालील फवारण्या कराव्यात. 

एक टक्का मायक्रो ग्रेड II १०० मिली १० लिटर पाण्यामध्ये मिसळून दोन वेळा १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी किंवा २ टक्के युरिया २०० ग्रॅम १० लिटर पाण्यामध्ये मिसळून २ वेळा पंधरा दिवसाच्या अंतराने फवारावे किंवा १.५ टक्के पोटॅशियम नायट्रेट १३: ००:४५ (१५० ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून) दोन वेळा १५ दिवसाच्या अंतराने फवारावे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Iran Conflict: दोन आठवड्यांची शस्त्रसंधी

Fruit Price Issue: फळपिकांना नाममात्र दर; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Jaggery Market Trade: कोल्हापूर बाजार समितीत गूळ सौद्यात अडथळे कायम

Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Onion Procurement Policy: केंद्र सरकारचा कांदा खरेदीत हात आखडता

SCROLL FOR NEXT