आंबा पिकावरील तुडतुडे आणि भुरीचा प्रादुर्भाव. 
कृषी सल्ला

Agriculture Update : कृषी सल्ला

कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

भात

  • रोप अवस्था
  • पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा क्षेत्रास १ किलो या प्रमाणे युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा.
  • वाल

  • फुलोरा अवस्था
  • पीक फुलोरा अवस्थेत असल्यास पाणी द्यावे.
  • नारळ

  • काळ्या डोक्याच्या अळीचे नियंत्रण ः
  • किडलेली पाने काढून नष्ट करावीत.
  • नियंत्रण डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.६ मिलि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी भाजीपाला/ फळबाग रोपवाटिका

  • वाढीची अवस्था
  • कलिंगडामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्रावणाची वेलीच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.
  • कोबीवर्गीय पिकामध्ये लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. रोपांना मातीची भर द्यावी.
  • किमान तापमानात घट संभवत असल्याने भाजीपाला पिकास तसेच रोपवाटीकेस संध्याकाळी पाणी द्यावे.
  • केळी

  • केळी पिकामध्ये पर्णगुच्छ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त झाडे मुनव्यासकट जमिनीतून समूळ उपटून नष्ट करावीत.
  • पर्णगुच्छ रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, डायमिथोएट अर्धा मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनंतर करावी.आंबा
  • पालवी आणि बोंगे फुटण्याची अवस्था
  • बोंगे फुटण्याच्या अवस्थेत तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढतो.
  • नियंत्रण ः फवारणी प्रति लिटर

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ०.६ मिलि ः झाडाच्या खोडावर, फांद्यावर व पानांवर योग्य रीतीने भिजेल अशी फवारणी करावी.
  • भुरीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, वरील फवारणीच्या द्रावणामध्ये हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मिलि किंवा गंधक (पाण्यात मिसळणारे ८० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे.
  • काजू

  • मोहोर अवस्था
  • मोहोर फुटण्याच्या अवस्थेत ढेकण्याचा (टी मॉंस्कीटो बग), फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • नियंत्रण

  • प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
  • ०२३५८- २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Production: सोयाबीन लागवड, उत्पादन घटणार

    Onion Storage Capacity: कांद्याची साठवणूक क्षमता वाढविण्याची केंद्राकडून तयारी

    Wheat Arrival : लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची उच्चांकी आवक

    Monsoon Forecast 2026: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

    Maharashtra Weather: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

    SCROLL FOR NEXT