शेतकरी नियोजन- पीक - डाळिंब 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन- पीक - डाळिंब

सध्या मृग बहरातील बागेत स्वच्छतेचे काम सुरू आहे. हस्त बहराच्या बागेत फळे फुगवण अवस्थेत आहेत. तर आंबिया बहरासाठी बाग सध्या ताणावर आहे.

Sudarshan Sutaar

शेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर एकूण क्षेत्र ः २१ एकर डाळिंब क्षेत्र ः २१ एकर चळे (ता. पंढरपूर) येथे माझी २१ एकर शेती आहे. गेल्या १३ वर्षांपासून डाळिंब बाग असून, १० वर्षांपासून संपूर्ण निर्यातक्षम उत्पादन घेत आहे. माझ्याकडे फुले भगवा या जातीची लागवड आहे. या वर्षी महाराष्ट्रातून युरोपला निर्यात करणाऱ्या तीन शेतकऱ्यांमध्ये माझा समावेश आहे. वर्षातील मृग, हस्त आणि अंबिया या तीनही बहरात डाळिंब उत्पादन घेतो. दरवर्षी सरासरी एकरी ८ ते १० टन निर्यातक्षम उत्पादन असते. प्रत्येकाचे निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशा प्रकारे नियोजन ठरवले आहे. त्यानुसार त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो. मृग बहराच्या बागेचे क्षेत्र ९ एकर, हस्त बहरातील बाग ६ एकर आणि आंबिया बहराचे सहा एकर असे क्षेत्र आहे. सध्या मृग बहरातील बागेत स्वच्छतेचे काम सुरू आहे. हस्त बहराच्या बागेत फळे फुगवण अवस्थेत आहेत. तर आंबिया बहरासाठी बाग सध्या ताणावर आहे. मृग बहरातील बागा

  • गेल्या पंधरवड्यापासून बागेतील खराब फळे काढून टाकणे, अनावश्यक फांद्या काढण्याचे काम सुरू आहे.
  • झाडाला अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळावेत. यासाठी मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्यासह
  • सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिला आहे.
  • कीड-रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठवड्यातच कीडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारणी घेतली आहे.
  •  झाडाच्या वयानुसार ४० ते ६० किलो या प्रमाणात प्रति झाडाला शेणखत टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
  • यामध्ये पाण्याचा वापर मात्र अगदीच काटेकोर केला जातो. जमिनीत वाफसा स्थितीत ओलावा ठेवला जातो.
  • हस्त बहरातील बाग

  • या बागेतील फळ सध्या फुगवण अवस्थेत आहे.
  • फळाचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्याला क्रॉप कव्हर लावण्याचे काम सुरू आहे.
  • अन्नद्रव्यांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाशच्या मात्रा देत आहे. त्या एसओपी आणि कॅल्शिअम नायट्रेटच्या स्वरूपात दिला आहे.
  • या कालावधीत फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यासाठी फवारणी घेतली आहे.
  • सध्या बुरशीजन्य रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसत नाही. मात्र मध्येच येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशकांची फवारणी केली आहे.
  • सध्या जानेवारीत आंबिया बहर सध्या जानेवारी महिन्यामध्ये बागेची ताण अवस्था आहे. येथे बहर धरण्याचे नियोजन सुरू आहे.

  • पानगळ केली जात आहे.
  • बागेला पहिले पाणी ८ ते १० तासांपर्यंत देतो आहे.
  • त्यानंतर पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा लागणार आहे.
  • या कालावधीत नवीन बहराच्या बागेवर मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी पाने चिकट होऊन, त्यावर बुरशींची वाढ होत असल्याने त्याला चिकटा असेही म्हटले जाते. या किडीला आटोक्यात ठेवण्यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी घेतली आहे.
  • पुढील पंधरवड्यातही या किडीच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
  • संपर्क ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे, ९८८१६५४५२५ (शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

    Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

    Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

    Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

    Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

    SCROLL FOR NEXT