शेतकरी नियोजन ः पीक केळी 
कृषी सल्ला

Banana Crop Management: शेतकरी नियोजन ः पीक केळी

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांच्यांकडे विविध टप्प्यांत लागवड केलेली सुमारे ६० एकर केळी आहे. पिकाचे केलेले नियोजन...

Chandrakant Jadhav

शेतकरी ः प्रेमानंद हरी महाजन

गाव ः तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र ः ११० एकर

केळी क्षेत्र ः ६० एकर

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांच्यांकडे विविध टप्प्यांत लागवड केलेली सुमारे ६० एकर केळी आहे. त्यात मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट यादरम्यान लागवड झालेल्या केळीचे प्रमाण अधिक आहे.

  1. खानदेशात सध्या थंड वातावरण असून, सूर्यप्रकाश कमी आहे. अशा स्थितीत काढणीवरील केळी बागांचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. मार्च, एप्रिल, मे यादरम्यान लागवडीच्या बागांची काढणी येत्या आठ व १५ दिवसांत सुरू होईल.

  1. उतिसंवर्धित रोपांची १०० टक्के लागवड केली आहे. केळीची निर्यात केली जाते. निर्यातक्षम उत्पादनासाठी बागांचे नियोजन केले आहे.

  1.  लागवड व काढणीचा कालावधी उन्हाळ्यात असल्याने काढणीवरील बागांची लागवड गादीवाफ्यावर साडेपाच फूट बाय साडेपाच फूट या अंतरात लागवड केली आहे. अन्य बागांची लागवड सहा फूट बाय सहा फूट अंतरात आहे.

  1. काढणीवरील बागांना सध्या दर सात दिवसाआड नत्र, गंधक व पालाश दिले जात आहे. ठिबकद्वारे प्रति एक हजार केळी झाडांना पाच किलो गंधक, सात किलो नत्र व १० किलो पालाश दिले जाते. यामुळे केळी घडांना चमकदारपणा येऊन, केळांचा आकार व लांबी वाढते. निर्यातक्षम केळी उत्पादनाच्या दृष्टीने केळीचा घेर, चमकदारपणा, लांबी याला अतिशय महत्त्व आहे. या खतांचा नियमित वापर केल्याने चांगला परिणाम दिसत आहे.

  1. काढणीवरील केळी बागांमध्ये थंडीमुळे करपा रोगाची लक्षणे दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन बागेची चांगली स्वच्छता केली आहे. बागेतील रोगग्रस्त किंवा रोगाला बळी पडू शकणारी पाने बागेबाहेर काढून ती जाळून नष्ट केली आहेत. बागेत बुरशीनाशकाची शिफारशीत मात्रेनुसार फवारणीही घेतली आहे.

  •  बागेतील केळी झाडांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निश्‍चित वेळापत्रकानुसार मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०.५४.३४) यासोबत कॅल्शिअम, बोरॉन याचीदेखील योग्य मात्रेनसार फवारणी घेतली आहे.
  •  घडाच्या कमळातील पाने काढून घेतली आहेत. बागेत पाने कुजणार नाहीत, याची काळजी घेतली आहे.
  •  केळी घडांची चांगली वाढ दिसत आहे. वेळेत काढणी होईल, अशी स्थिती योग्य व्यवस्थापनामुळे तयार झाली आहे.
  • - प्रेमानंद महाजन, ९७६३८९३७७७ (संपर्क ः दुपारी दोन ते तीन या वेळेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

    Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

    Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

    Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

    Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

    SCROLL FOR NEXT