health Benefits of drumsticks
health Benefits of drumsticks 
कृषी सल्ला

बहुउपयोगी, आरोग्यदायी शेवगा

डॉ. मन्मथ सोनटक्के, गणेश राऊत

शेवगा त्याच्या विविध आरोग्यवर्धक गुणांमुळे आयुर्वेदात बहुउपयोगी मानला जातो. पानापासून ते बियांपर्यंत सर्वच औषधोपयोगी आहे. शेवग्यामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे, तसेच कॅल्शिअम,फॉस्फरस, लोह, आयोडीन ही खनिजद्रव्ये, प्रथिने, तंतुमय पदार्थ हे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.  शेवग्याच्या पानाची पावडर, बियांची पावडर याचा वापर विविध प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये मूल्यवर्धन व संशोधन करण्यास वाव आहे. तसेच, जगभरातील विविध भागांतून याला चांगली मागणी आहे. पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेल्या शेवग्याच्या पानाच्या पावडरचा उपयोग विविध पदार्थांमध्ये मिश्रण करून कुपोषण थांबवण्यासाठी पोषक आहार म्हणून केला जाऊ शकतो.  शेवगा त्याच्या विविध आरोग्यवर्धक गुणांमुळे आयुर्वेदात बहुउपयोगी मानला जातो. पानापासून ते बियांपर्यंत सर्वच औषधोपयोगी आहे. शेवग्यामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे, तसेच कॅल्शिअम,फॉस्फरस, लोह, आयोडीन ही खनिजद्रव्ये, प्रथिने, तंतुमय पदार्थ हे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्याचबरोबर यामध्ये आठ प्रकारचे उच्च प्रतीचे अमिनो आम्ल तसेच, अँटिऑक्सिडंट व प्रतिवेदना तत्त्वे आणि उपयोगी रस्त्याने आढळतात. 

  • शेवगा हा त्याच्या नैसर्गिक पोषक गुणधर्मांमुळे आरोग्याकरिता फायदेशीर ठरत आहे.  
  • फळ-भाज्यांच्या तुलनेत १०० ग्राम शेवग्यामध्ये गाजरापेक्षा दहा पटीने अधिक अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा सात पटीने अधिक क जीवनसत्त्व, दुधापेक्षा सतरा पटीने अधिक प्रमाणात कॅल्शिअम तसेच केळ्यामध्ये असलेल्या पंधरा पटीने अधिक पोटॅशिअम, पालकापेक्षा पंचवीस पटीने अधिक  प्रमाणात लोह, आणि दह्यामध्ये असतात.
  • शेंगांचा वापर आपल्या दैनंदिन आहारात विविध प्रकारे केला जाऊ शकतो. सामान्यतः शेंगांची आमटी, शेंगांची मिरवणी, शेंगांची आमटी, शेंगांची मसालेदार भाजी, शेंगांचं पिठलं, शेवग्याच्या शेंगा घालून केलेली कढी व शेवग्याच्या पानांची भाजी अशा प्रकारे किंवा लोणचे, सॅलड, सूप करण्यासाठी याचा वापर करतात.
  • विविध औषधी गुणधर्म 

  • पानांच्या रस रक्तदाब, रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • पानांपासून तयार केलेले चूर्ण हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. 
  • शेवग्याच्या शेंगा आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. 
  • शेंगांमधील मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे, क्षार आणि इतर पोषक तत्त्वे आहेत. शरीराच्या पोषणासाठी आरोग्यवर्धक असतात.
  • मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.डोळ्यांचा आजार कमी करण्यास फायदेशीर ठरते.
  • शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळं संधिवात व हाडाच्या आजारावर उपयोगी ठरते.
  • पोटात कृमी होऊ नयेत यासाठी शेवग्याच्या शेंगांची भाजी खाणे लाभदायक ठरते. 
  • पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. 
  • वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
  • शेवग्याचे सूप रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरते
  • संपर्क- डॉ. मन्मथ सोनटक्के, ९५११२९४०७४ (एम. जी. एम. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

    POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    SCROLL FOR NEXT