Farmer Planning for Sorghum Crop  
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक - ज्वारी

ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे.

Sudarshan Sutaar

ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे. शेतकरी  ः संतोष बळिराम काटमोरे गाव ः पिंपरी (सा), ता. बार्शी, जि. सोलापूर एकूण क्षेत्र ः पाच एकर ज्वारी क्षेत्र ः एक एकर पूर्वी ज्वारीसाठी घरगुती बियाणे वापरत होतो. मात्र, उत्पादन वाढीसाठी गेल्या काही वर्षापासून सुधारित वाणाचा वापर सुरू केला आहे. ज्वारीच्या ‘फुले रेवती’ या सुधारित वाणाची ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली आहे. यामुळे ज्वारीतील अंतर योग्य राहण्यास मदत होते. बीजप्रक्रिया आणि पेरणी पद्धती महत्त्वाची ठरते. पुढे विरळणी करून रोपांची संख्या योग्य ठेवली. ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे. या वर्षीचे नियोजन 

  • ज्वारीच्या पेरणी आधी मशागत करून त्यात दोन ट्रॉली गावखत टाकले.
  • त्यानंतर २९ ऑक्टोबरला ज्वारीची पेरणी केली.
  • ट्रॅक्टरच्या साह्याने १८ इंचांवर ज्वारीचा पेरा केला.
  • तत्पूर्वी बुरशीनाशक आणि जैविक घटकांची बीजप्रक्रिया केली.
  • ट्रॅक्टरच्या साह्याने पेरल्यामुळे एकसारखे बी पडले.
  • या पेरणीमुळे दोन ओळीतील अंतर १८ इंच, दोन रोपातील अंतर ६ इंचापर्यंत राहिले.
  • ज्वारीसाठी सुधारित वाण फुले रेवतीचा वापर केला.
  • एकरी फक्त चार किलो बियाणे लागले.
  • पेरणीनंतर दहा दिवसांनी स्प्रिंकलरने आठ तासांपर्यंत पाणी दिले.
  • पुन्हा आणखी दहा दिवसांनी स्प्रिंकलरने आठ तासांपर्यंत पाणी दिले.
  • महिनाभराने ज्वारीची खुरपणी केली. दाट झालेल्या झाडांची विरळणी करताना ५-६ इंचावर एक रोप ठेवले.
  • ५० दिवसांनी लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी केली.
  • त्यानंतर विद्राव्य खताची (१९ः१९ः१९) फवारणी केली.
  • ज्वारी मोठी झाल्यामुळे ६० व्या दिवशी पाटाने पाणी दिले.
  • आता पुढील पंधरा दिवसाचे नियोजन

  • सध्या ज्वारीला ८० दिवस झाले आहेत.
  • सध्या ती फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.
  • आता आणखी एक पाणी ठिबक संचाद्वारे साधारण महिनाअखेरपर्यंत देणार आहे.
  • या पाण्यासोबतच सल्फेट ऑफ पोटॅश (०ः०ः ५०) हे विद्राव्य खत दोन किलो प्रमाणे ठिबक संचातून देणार आहे.
  • संपर्क ः संतोष काटमोरे, ९९२३८६७००० (शब्दांकन- सुदर्शन सुतार)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    India Sugar Season: देशाच्या साखर हंगामाची पंधरवड्यात समाप्ती

    Chana Procurement Issue: बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी ठप्प

    Maharashtra Weather: पाऊस बरसणार, होरपळ कमी होणार

    Livestock Management: मान्याचीवाडीत पशूंसाठी स्नानगृह

    Lift Irrigation Scheme: उद्दिष्ट ३६०० हेक्टरचे; सिंचन फक्त दोन हजारच!

    SCROLL FOR NEXT