भाताच्या तेरा जातींचा झाला तुलनात्मक जनुकीय अभ्यास
भाताच्या तेरा जातींचा झाला तुलनात्मक जनुकीय अभ्यास 
कृषी सल्ला

भाताच्या तेरा जातींचा झाला तुलनात्मक जनुकीय अभ्यास

कोजेन्सिस वृत्तसेवा

भात हे जागतिक पातळीवरील सुमारे २० टक्के लोकांच्या खाद्याची गरज भागवते. वर्ष २०५० पर्यंत वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अधिक उत्पादन करण्याची आवश्‍यकता वाढत आहे, त्यासाठी संशोधनात्मक पातळीवर प्रचंड वेगाने बदल होत आहे. या बदलामध्ये जनुकीय तंत्रज्ञान हा कळीचा मुद्दा ठरू पाहत आहे. कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी येथील संशोधकांनी भाताच्या तेरा जातींचे जनुकीय पातळीवर तुलनात्मक विश्‍लेषण केले आहे. या नव्या संशोधनामुळे भात पिकाच्या कीड-रोग प्रतिकारक, विविध हवामानातही तग धरण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण करण्यासाठी कार्यरत जनुकांची माहिती मिळते. भविष्यात त्याचा फायदा नव्या जातींच्या पैदाशीसाठी होऊ शकतो.

वातावरणातील बदलांचे पिकांवर परिणाम होत आहेत. अशा वेळी उत्पादनामध्ये घट होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यावर मात करण्यासाठी अमेरिकी कृषी विभाग आणि कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी (CSHL) येथील शास्त्रज्ञ डोरेन वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भात पिकांच्या जनुकीय माहिती आणि त्याचे विश्‍लेषणाचा एक प्रकल्प राबवला होता. असाच एक प्रकल्प ॲरिझोना विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. रॉड विंग आणि CSHL चे माहिती व्यवस्थापक डॉ. जोशुआ स्टेन यांनीही राबवला होता. या प्रकल्पामध्ये भाताच्या सात जंगली जाती आणि नगीना २२ व आयआर ८ या दोन स्थानिक शेतीमधील लोकप्रिय जातींचा समावेश होता. या जाती १९६७ मध्ये विकसित केलेल्या असून,अधिक उत्पादनक्षम असल्याने ‘‘मिरॅकल राईस’’ या नावानेही ओळखल्या जातात. या जातींमुळे आशियातील हरितक्रांतीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाताच्या नऊ जातींच्या जनुकीय संरचना आणि पूर्वी मिळवण्यात आलेल्या चार जंगली जातींच्या संरचना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यातून सुमारे १५ दशलक्ष वर्षाच्या उत्क्रांतीविषयीची माहिती गोळा झाली आहे. या जाती आशिया, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या वैविध्यपूर्ण ठिकाणी सापडतात. त्यामुळे वैविध्यपूर्ण हवामानासाठी आवश्‍यक अशी त्यांची उत्क्रांती होत गेलेली आहे. त्याविषयी माहिती देताना डोरेन वारे म्हणाले, की जंगली जातींमध्ये एक प्रकारचा काटकपणा भरून राहिलेला आहे. या जाती रोग किंवा अन्य ताण असलेल्या स्थितीला सामोऱ्या जाताना होणाऱ्या नेमक्‍या जनुकीय बदलांचा अभ्यासामध्ये समावेश होता. रोगांच्या प्रतिकारासाठी कार्यरत अशा हजारो जनुकांचा शोध घेतला आहे. ही जनुके बुरशी, जिवाणू आणि अन्य कीटकांमुळे होणाऱ्या रोग प्रादुर्भावाला रोखण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. या जनुकांचा नेमका वापर करून नव्या जातींच्या पैदासीला चालना मिळणार असल्याचे डॉ. जोशुआ स्टेन यांनी सांगितले. नव्या तंत्रज्ञानामुळे नव्या जातींच्या पैदाशीचा वेग प्रचंड वाढणार आहे. या अभ्यासाचा अहवाल २२ जानेवारीला प्रकाशित ‘नेचर जेनेटिक्‍स’ मध्ये मांडण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT