Onion seed production plot  
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : कांदा

आमची वडिलोपार्जित १५ एकर शेती असून त्यात कांदा, ज्वारी, सोयाबीन, उडीद आणि भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मागील ६ वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात साधारणपणे ४ ते ५ एकरांवर कांदा लागवड करत आहे. सोबत थोड्या क्षेत्रावर उन्हाळ्यामध्ये कांदा बिजोत्पादन करत होतो.

Suryakant Netke

शेतकरी- वैभव आबासाहेब गोल्हार गाव - बावी, ता. आष्टी, जि. बीड एकूण क्षेत्र - १५ एकर कांदा लागवड - २.५ एकर मी बीए, बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. आमची वडिलोपार्जित १५ एकर शेती असून त्यात कांदा, ज्वारी, सोयाबीन, उडीद आणि भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मागील ६ वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात साधारणपणे ४ ते ५ एकरांवर कांदा लागवड करत आहे. सोबत थोड्या क्षेत्रावर उन्हाळ्यामध्ये कांदा बिजोत्पादन करत होतो. गेल्या ३ वर्षांपासून त्यात वाढ करत आता अडीच एकरांवर बिजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे.   यावर्षीचे नियोजन 

  • रब्बीतील कांदा व सोयाबीन पीक निघाल्यानंतर त्याच शेतामध्ये कांदा बिजोत्पादनाचे नियोजन असते. त्यानुसार डिसेंबरमध्ये नांगरणी आणि रोटावेटर फिरवून पूर्वमशागत केली. 
  •  त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट, डीएपी, १०ः२६ः२६ एकरी ५० किलो प्रमाणे खतमात्रा दिली. शेणखताचा वापर दोन वर्षांतून एक वेळ केला जातो.
  •  कांदा लागवडीसाठी साधारण ४ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यात ठिबक टाकून दोन्ही बाजूने दोन ठोबांत ९ इंच व दोन ओळींत १२ इंच अंतर ठेवून कांदा गोटाची १ जानेवारी रोजी लागवड केली. 
  • रब्बी हंगामात कांद्याचे साधारण ३० क्विंटल कांदा उत्पादन मिळाले. त्यातील एकसारख्या आकाराचा व डेंगळा नसलेल्या कांद्याची निवड बिजोत्पादनासाठी केली. 
  • उन्हाळ्यात दोन दिवसाआड दीड तास ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन असते. सध्या ४ दिवसाला पाणी देत आहे. 
  •  लागवडीनंतर १ महिन्याने फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी जैविक पद्धतींचा अवलंब केला.
  • आगामी नियोजन 

  • सध्या पीक सव्वा दोन महिन्याचे झाले आहेत. 
  • पांढरी मुळी तयार होण्यासाठी दर महिन्याला ह्युमिक ॲसिड एकरी १ किलो प्रमाणे ठिबकद्वारे दिले जाईल.
  • ठिबकद्वारे १९ः१९ः१९ एकरी ५ किलो प्रमाणे दिले जाईल. त्यामुळे झाडांची वाढ, फळवाढ आणि बोंडे वाढण्यास मदत होते. 
  • बोंडे वाढून फुलांच्या संख्येत वाढ होण्यासाठी १२ः६१ः० (मोनो अमोनिअम फॉस्फेट) एकरी ५ किलो प्रमाणे ठिबकद्वारे दिले जाईल. 
  •  बिया परिपक्व होण्यासाठी साधारण तीन महिन्यानंतर ७ दिवसाआड ०ः५२ः३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) एकरी ५ किलो प्रमाणे ठिबकद्वारे देणार आहे.
  •  कांदा बिजोत्पादनामध्ये मधमाशा फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी गुळाचे पाणी आणि ताक एकत्रित करून फवारणी केली जाईल. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी घेतली जाईल. 
  • दर्जेदार बियांचे उत्पादन मिळण्यासाठी एकरी साडेसात किलो पोटॅशिअम सोनाइट ड्रीपद्वारे दिले जाईल. 
  • कांदा बियाणे साधारणपणे साडेचार महिन्यांनी काढणीस तयार होते. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट आली. यावर्षी अडीच एकरातून चांगले बियाणे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. 
  • उत्पादित कांदा बियाणे दर्जेदार असल्यामुळे शेतकरी घरी येऊन खरेदी करतात. मागील वर्षी प्रति किलो बियाणास साधारण २ हजार इतका दर मिळाला. 
  • - वैभव गोल्हार,  ९४२०४१२९००  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Husbandry Department: पशुसंवर्धनचा ‘दर्जे’दार विकास

    Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस

    Chhagan Bhujbal: बनावट कुणबी प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती नेमा: छगन भुजबळ

    Fruit Vegetables Loss: कृषी बाजार समितीतील फळे-भाजीपाल्याचे नुकसान

    Sanyukt Kisan Morcha: संयुक्‍त किसान मोर्चा आजपासून तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर

    SCROLL FOR NEXT