Moth bean cultivation
Moth bean cultivation 
कृषी सल्ला

मटकी लागवडीसाठी सुधारित तंत्र

संजय बडे 

मटकी पीक कमी पावसातही चांगले उत्पादन देते. पेरणी १५ जून ते ७ जुलैपर्यंत करावी. मॉन्सूनचा पहिला पाऊस (६० ते ७० मिमी पाऊस) झाल्यानंतर लगेच पेरणी करावी. आंतरपीक म्हणून मटकी लागवड फायदेशीर ठरते.  मटकी हे एक कोरडवाहू शेतातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात मटकीची लागवड केली जाते. बाजरी व कापूस या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून मटकीची लागवड करता येते.  जमीन व हवामान 

  • मध्यम, कमी पाणी धारण क्षमतेची, पाण्याचा निचरा होणारी जमीन पिकास मानवते. 
  • चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत मटकीची लागवड करू नये. 
  • कमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड केली जाते. 
  •  साधारणपणे २४ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान पिकाच्या वाढीस आवश्‍यक असते.
  • लागवडीसाठी जाती  एम.बी.एस.-२७, मोट नं.-८८. बीजप्रक्रिया  प्रति किलो बियाण्यास, 

  • ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम.
  •  थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम.
  • रायझोबिअम जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम.
  • बियाणे प्रमाण 

  •     लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पुरसे होते.
  •     आंतरपीक म्हणून ५ ते १० किलो बियाणे पुरेसे आहे.
  • लागवड 

  • साधारणपणे १५ जून ते ७ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी किंवा मॉन्सूनचा पहिला पाऊस (६० ते ७० मिमी पाऊस) झाल्यानंतर लगेच पेरणी करावी.
  • पेरणी तिफणीने, सरत्याने, पाभरीने किंवा काकरीच्या साह्याने करावी.
  • साधारणपणे दोन ओळींत ३० सेंमी व दोन झाडांत १० सेंमी अंतर राहील अशा पद्धतीने पेरणी करावी.
  • पेरणीची खोली ३ ते ४ सेंमी असावी. 
  • सलग पेरणीसाठी मूग, उडीद, सोयाबीन प्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी व सहावी ओळ खाली ठेवून नंतर डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पाडून घ्यावा. अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
  • खत व्यवस्थापन  पेरणीच्यावेळी एकरी ३० किलो डी.ए.पी. व १५ किलो एम.ओ.पी.   द्यावे. तसेच पेरणीवेळी एकरी ८ किलो गंधक देणे फायद्याचे ठरते. तण व्यवस्थापन 

  • पीकवाढीच्या सुरुवातीचे ३० ते ४५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यानंतर पीक पूर्ण शेत व्यापत असल्याने तणांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. 
  • पीक २० दिवसांचे व ३० दिवसांचे असताना डवऱ्याचा फेर द्यावा. निंदणी करावी.
  • - संजय बडे,  ७८८८२९७८५९ (दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT