पपईच्या एका फळातून जास्‍तीत जास्‍त ५ वेळा चिक काढावा.
पपईच्या एका फळातून जास्‍तीत जास्‍त ५ वेळा चिक काढावा. 
कृषी प्रक्रिया

कच्च्या पपईपासून पेपेन निर्मिती

शारदा पाटेकर

पपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून, कच्च्या व पक्‍क्‍या फळाचा वापर खाण्यासाठी, तसेच उद्योगधंद्यासाठी केला जातो. त्यापैकी पेपेन हा व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ पपईपासून मिळतो.

कच्च्‍या पपईच्‍या फळावरून चिरा पाडल्‍यानंतर त्‍यामधून पांढरा दुधासारखा चिक निघतो तो जमा करून त्‍याच्‍या पासून भुकटी स्‍वरुपात तयार केलेल्‍या पदार्थाला पेपेन असे म्‍हणतात. पावसाळी व हिवाळी हंगामामध्‍ये चिक जास्‍त तयार होतो, त्‍यामुळे पूर्ण वाढ झालेल्‍या व कच्‍या गर्द हिरव्‍या रंगाच्‍या पपई पासून चिक काढावा. हवेमध्ये आर्द्रता जास्त असल्यास चीक पाझरण्याचा वेग अधिक असतो. म्हणून चीक सकाळच्या वेळेत काढणे अधिक फायद्याचे ठरते. फळधारणेनंतर साधारण ७५ ते ९० व्या दिवशी हिरव्या फळांपासून पेपेन गोळा केले जाते. अशा प्रकारे दर चार ते ५ दिवसांनी चिक गोळा करून तो वाळविला जातो.

पेपेन काढणी

  • प्रथम अॅल्‍युमिनीयमचा चाकू किंवा रेझर ब्‍लेड च्‍या साह्याने देठापासून ते टोकापर्यंत अशा वरुन खाली ७ ते ८ उभ्‍या चिरा हळुवारपणे ओढाव्‍यात.
  • चिरा या ०.३ से.मी. पेक्षा जास्‍त खोल नसाव्‍यात.
  • गळणारा चिक मोठया आकाराच्‍या अॅल्‍युमिनीयम ट्रे मध्‍ये जमा करावा. प्रथम चीरा ओढलेल्‍या फळांचा चिक गळणे बंद झाल्‍यावरच दुसऱ्या झाडांवरील फळांना चिरा ओढाव्‍यात.
  • साठलेला चिक एकत्रीत केल्‍यानंतर तातडीने त्‍यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. अन्यथा पेपेनची प्रत बिघडून वजनात घट होण्‍याची शक्‍यता असते. साधारण २४ तासांत ३ टक्के घट होते.
  • जमा केलेला चिक प्रथम गाळून घ्‍यावा.
  • चिक सुकविण्‍यासाठी १०० किलो चिकात एक किलो सोडीयम-पोटॉशिअम मेटाबायसल्‍फाईड पावडर मिसळावी. त्‍याचा फायदा पेपेनची आम्‍लता टिकविण्‍यासाठीही होतो.
  • व्‍हॅक्‍युम ओव्‍हन किंवा केबिनेट ड्रायरचा उपयोग करून ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला चिक सुकविण्‍याची क्रिया जलदपणे होते.
  • सुकल्‍यानंतर चिकाच्‍या खपल्‍या होऊन त्‍याच्‍या पासून पेपेन ची भुकटी करावी नंतर भुकटी चाळून पॉलीथिनमध्‍ये एअर टाईट भरून ठेवावी.
  • चिक काढताना घ्‍यावयाची दक्षता

  • एकाच फळातील चिक काढताना दोन वेळेतील अंतर ४ ते ५ दिवसांचे असावे.
  • एका फळातून जास्‍तीत जास्‍त ५ वेळा चिक काढावा.
  • जुन्‍या चिरावंर पुन्‍हा चिरा देऊ नये. चिक काढण्‍यासाठी फळावर चिरा पाडण्‍याचे काम सकाळी लवकर करावे.
  • पेपेनचे उपयोग

  • पेपेन हे प्रथिने पचविणारे तसेच प्रथिनांचे साध्‍य रसायणात रूपांतर करणारे एन्‍झाइम आहे.
  • पेपेन हे आम्‍लता आणि विम्‍लता या दोन्‍ही माध्‍यमांत काम करते.
  • मांसाहार कारखाण्‍यामध्‍ये कातडी कमविण्‍यासाठी तसेच जनावरांचे मांस मृदू करण्‍यासाठी देश परदेशात याचा वापर केला जातो. यामुळे कातडीचा भाग मऊ होऊन कातडीस चमक येते.
  • मांस शिजवण्‍यासाठी पेपेनची पावडर टाकली जाते. त्‍यामुळे ते पचण्‍यास हलके होते.
  • जनावरांच्‍या खाद्यामध्‍ये पेपेन मिसळल्‍यानंतर ते खाद्य लवकर पचते.
  • बिस्‍कीट मऊ होण्‍यासाठी बेकऱ्यांमध्‍ये देखील पेपेनचा वापर करतात.
  • संपर्क ः शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८ (शिवरामजी पवार अन्‍नतंत्र महाविद्यालय, नेहरुनगर, कंधार, जि. नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

    Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

    Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

    Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

    Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

    SCROLL FOR NEXT