sapota jam
sapota jam 
कृषी प्रक्रिया

चिकूपासून टॉफी, जॅमनिर्मिती

डॉ. ए. पी. खापरे

चिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प), स्क्वॅश, पावडर इ. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ तयार करता येतात.

चिकू टॉफी 

  • पिकलेली फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. टॉफी तयार करण्यासाठी चिकू गर (पल्प) १ किलो, साखर ६५० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ८० ग्रॅम, दूध पावडर ६० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम आणि वनस्पती तूप १०० ग्रॅम इ. प्रमाण वापरावे.
  • गर जाड बुडाच्या कढईत टाकून त्यात वितळलेले वनस्पती तूप मिसळून घ्यावे. 
  • हा गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा. 
  • त्यात मोजलेली साखर, दूध पावडर, सायट्रिक आम्ल हे घटक टाकून मिश्रण एकजीव करावे. 
  • मंद आचेवर मिश्रण सतत ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज टाकून मिश्रणाचा शर्करांश (साखरेचे प्रमाण) ७०-७२ अंश ब्रिक्सच्या (शर्करांश मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रक्ट्रोमीटरचा वापर करावा) दरम्यान आल्यावर गॅस बंद करावा. 
  • हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून ठेवावे. 
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे ०.७ ते १ सें. मी. जाडीचे काप करावेत. 
  • तयार टॉफी बटर पेपर किंवा टॉफी रॅपरमध्ये पॅक करावी. 
  • चिकू जॅम

  • पिकलेली चिकू फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. 
  • जॅम तयार करण्यासाठी १ कि.ग्रॅ. गर (पल्प) स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्यात ७५० ग्रॅम साखर टाकून गॅसच्या मंद आचेवर शिजवून त्यामध्ये साखर पूर्णतः विरघळून घ्यावी. 
  • त्यानंतर मिश्रणात १.५ ते २ % सायट्रिक आम्ल मिसळावे (आम्ल टाकल्यामुळे जॅममध्ये साखर पूर्णतः विरघळते व त्याचे पांढरे स्फटिक तयार होत नाहीत). 
  • जॅम तयार झाला आहे का नाही हे ओळखण्यासाठी त्याचा शर्करांश (साखरेचे प्रमाण-ब्रिक्स) ६८.५ टक्के आला आहे का हे पाहावे (शर्करांश मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रक्ट्रोमीटरचा वापर करावा.) किंवा त्याचा १ थेंब ग्लासमधील पाण्यात टाकून तो जर न विरघळता जसाच्या तसा राहिला तर जॅम तयार झाला आहे असे समजावे. 
  • तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा.
  •  -  डॉ. ए. पी. खापरे, ०८०५५२२६४६४ (वरिष्ठ संशोधन सहायक, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    SCROLL FOR NEXT