Onion Rate
Onion Rate Agrowon
कंद पिके

Onion Rate : दोनशे रुपयांनी कांदा दरात फायदा

टीम ॲग्रोवन

नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारी (ता.२६) गावरान कांदा दरात साधारणपणे प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आवकेत मोठी घट आहे. सोमवारी केवळ ११ हजार १३९ क्विंटल कांद्याची आवक झाली.

प्रती क्विंटलला १०० रुपयांपासून १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून कांदा दरातवाढ नाही.

एकतर गतवर्षी पावसाने कांद्याचे नुकसान झाले. अनेक अडचणीवर मात करून उत्पादन घेतले असताना दर नसल्याने कांदा उत्पादक हतबल होते.

कांद्याला दर येईल या आशेने शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला आहे. मात्र दरात वाढ होत नसल्याने आता दरवाढ होईल की नाही अशी चिंता सतावत आहे. त्यात गेल्या काही दिवसापासून सततच्या पावसाने कांद्याचे नुकसानही होत आहे. जास्त दिवसांपासून कांदा साठवून ठेवल्याने खराब होऊ लागला आहे.

सोमवारी (ता. २६) नगरला झालेल्या लिलावात मात्र चांगल्या प्रतीच्या कांदा दरात प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

आशादायक चित्र

एक नंबर कांद्याला १४०० ते १७००, दोन नंबरच्या कांद्याला १००० ते १४००, तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते १ हजार, व चार नंबरच्या कांद्याला १०० ते ५०० रुपयांचा दर मिळाला.

सरासरी ८०० ते १ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. अनेक दिवसांपासून दर वाढ नसताना काल दोन रुपयांनी झालेली वाढ आशादायक चित्र निर्माण करत आहे. आवकेत मात्र मोठी घट झाली. केवळ अकरा हजार क्विटंल कांदा आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT