Disel Agrowon
इंधन शेती

डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरने मशागत महागली

देशात दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत. याची झळ सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही बसू लागली आहे. यंदाच्या हंगामात डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतीच्या दरातही ट्रॅक्टरमालकांनी वाढ केली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला : देशात दररोज पेट्रोल व डिझेलचे (Petrol) भाव वाढत आहेत. याची झळ सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही बसू लागली आहे. यंदाच्या हंगामात डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या (Tracter) साह्याने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतीच्या दरातही ट्रॅक्टरमालकांनी वाढ केली आहे. मशागतीचा दर किमान २०० रुपयांनी महागल्याने याची मोठी झळ बसू लागली आहे. शिवाय शेतीचा उत्पादन खर्चही आणखी वाढणार आहे.

गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिरावले होते. मात्र पाच राज्यांतील निवडणुकांची रणधुमाळी आटोपताच हे दरवाढीचे चक्र फिरू लागले. गेल्या तीन दिवसांत पेट्रोलची तीन रुपयांपेक्षा अधिक दर वाढ झाली. अशीच दरवाढ डिझेलमध्येही होत आहे. अकोल्यात २२ मार्चला डिझेलचा दर ९३ रुपये ६५ पैसे दर होता. शनिवारी (ता. २६) हाच डिझेलचा प्रतिलिटर दर ९६.१७ रुपये एवढा झाला.

दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहरी भागातील नागरिक इंधन दरवाढीने मेटाकुटीला आलेला आहे. तशीच शेतकऱ्यांचीही(Farmer) चिंता वाढली आहे. सध्याच्या काळात शेतीतील मशागतीची संपूर्ण कामे ट्रॅक्टरशिवाय केली जात नाहीत. आता पुढील हंगामाच्या तयारीचे दिवस सुरू होत आहे. गुढीपाडवा लोटताच शेतशिवारात(Farm) ही तयारी सुरू होत असते. रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, पंजी, अशा वेगवेगळ्या मशागती केल्या जातात. शिवाय सध्या थ्रेशरच्या साह्याने हरभरा मळणीचे कामही होत आहे. या सर्वच कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. यासाठी लागणारे डिझेल महागल्याने ट्रॅक्टरमालकांनी थेट दरवाढ केली आहे. कामे करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात डिझेल पुरविण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

हार्वेस्टरने काढणी महागली..

गेल्या वर्षात वाशीम जिल्ह्यात गहू काढणीचा दर हार्वेस्टरने एकरी बाराशे रुपये होता. तो दर यंदा पंधराशे रुपये असा घेतला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी गहू(Wheat) काढणीचा दर १,५०० रुपये प्रति एकर होता तो या वर्षी २,००० रुपयांपर्यंत वाढला आहे.

सर्वच कामांचे दर वाढले आहेत. गेल्या हंगामात गहू, (Wheat) हरभरा (Chana) मळणी आमच्या भागात २०० रुपये पोते दराने केली जात होती. यंदा २७५ ते ३०० रुपये पोते झाले आहे. नांगरटीचा दर सरासरी २०० रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
- अमोल खर्चे, शेतकरी,
आडविहिर, ता. मोताळा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT