Ajit Pawar  Agrowon
Image Story

Ajit Pawar: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बाजू शासनासमोर मांडू : अजित पवार

राज्यातील विविध भागात पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. मात्र कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. या दमट वातावरणामुळे शंखी गोगलगायींची (Snail) संख्या वाढली आहे.

Team Agrowon

राज्यातील विविध भागात पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. मात्र कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. या दमट वातावरणामुळे शंखी गोगलगायींची (Snail) संख्या वाढली आहे.

त्यामुळे पेरणी झालेल्या भागात सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) पिकांमध्ये शंखी गोगलगायींनी धुमाकूळ घातला आहे. परिणामी राज्यातील मराठवाडा, विदर्भातील शेतकरी हैराण झाले आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विदर्भ-मराठवाडा दौऱ्यावर असताना अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी उध्वस्त केलेल्या पिकाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडेही (Dhananjay Munde होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अजित पवार यांनी शंखी गोगलगायींनी केलेल्या नुकसानासाठी आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करण्याचे आश्वसान दिले.

काही शेतकऱ्यांनी शंखी गोगलगायींच्या त्रासामुळे दोनदा-तीनदा पेरणी केली. मात्र तरीही शंखी गोगलगायी पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळे यंदाचे खरीप पीक हातून जाते की, काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजित पवार यांना तक्रारीचं निवेदन दिले आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलैमध्ये चांगला पाऊस बसरला. त्यामुळे वातावरण अधिकच दमट झाले. परिणामी मिळपीडस Millipedes म्हणजेच पैसा, वाणू, गोगलगायीची संख्या झपाट्याने वाढली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT