Kisan Drone Agrowon
Image Story

किसान ड्रोनसाठी किती मिळणार अनुदान?

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान ड्रोन वापरावेत, यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकरी, लहान व अल्पभूधारक शेतकरी, ईशान्य भारतातील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना किसान ड्रोन खरेदीसाठी एकूण किमतीच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

Devendra Shirurkar
Agriculture Drone

जमिनींच्या नोंदींचे डिजिटायजेशन, पीकपाहणी, कीडनाशके व खतांची फवारणी या गोष्टींसाठी केंद्र सरकार किसान ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

Agriculture Drone

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान ड्रोन वापरावेत, यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर कसा करावा, याची माहिती देणारी प्रात्यक्षिके सुरु झाली आहेत. काही संस्थांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. या संस्थांव्यतिरिक्त केंद्र आणि राज्यातील इतर कृषी संस्थांनाही मान्यता देण्यात आली आहे.

Agriculture Drone

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान ड्रोन वापरावेत, यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकरी, लहान व अल्पभूधारक शेतकरी, ईशान्य भारतातील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना किसान ड्रोन खरेदीसाठी एकूण किमतीच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. पाच लाख रूपयांच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येईल.

Agriculture Drone

इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ४० टक्के किंवा जास्तीत जास्त ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

Agriculture Drone

अनेक गावांमध्ये शेतकरी उत्पादक संघटना (FPO) किंवा कृषी प्राथमिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवजारे भाड्याने देण्याची सेवा (कस्टम हायरिंग सेंटर) पुरवली जाते. या कस्टम हायरिंग सेंटर्सना (CHS) ड्रोन खरेदीसाठी ४० टक्के किंवा जास्तीत जास्त चार लाख रूपये अनुदान दिले जाणार आहे.

Agricultural Drone

एखाद्या कृषी पदवीधराने कस्टम हायरिंग सेंटर सुरु केल्यास त्याला ड्रोन खरेदीसाठी ५० टक्के अथवा जास्तीत जास्त पाच लाख रूपये अनुदान मिळणार आहे. एका ड्रोनची किंमत साधारणपणे दहा लाख रूपयांच्या घरात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT