Cotton New Variety Agrowon
Image Story

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून कापसाचे चार वाण विकसित

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने महाराष्ट्रासाठी अधिक लांब धागा (लाँग स्टेपल) असलेले, तर दक्षिण विभागासाठी गर्द तपकिरी रंगाचे नवे कापूस वाण (New Cotton Verity) संशोधित केले आहे.

Team Agrowon

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने महाराष्ट्रासाठी अधिक लांब धागा (लाँग स्टेपल) असलेले, तर दक्षिण विभागासाठी गर्द तपकिरी रंगाचे नवे कापूस वाण (New Cotton Verity) संशोधित केले आहे. हे दोन्ही वाण केंद्र सरकारकडून नोंदणीकृत झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आलेले ‘सुरक्षा’ हे वाण नॉन बीटी (Non BT Cotton) आहे. या सरळ वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या धाग्यांची लांबी ही ३२ मि.मी.आहे. १६० दिवसांत हे वाण परिपक्‍व होत असून, हेक्‍टरी उत्पादकता २३ क्‍विंटल मिळते.

दक्षिण भागासाठी ‘वैदेही-१’ हे रंगीत कापसाचे वाण विकसित करण्यात आले आहे. नैसर्गिकरीत्या गर्द तपकिरी रंगाचा कापूस या वाणापासून मिळविणे शक्‍य होते.

सिंचन सुविधा असल्यास या कापसाची उत्पादकता २० क्‍विंटल, तर कोरडवाहू भागात १५ क्‍विंटल इतकी मिळते. सध्या नैसर्गिक रंगांना मागणी आहे. त्यामुळे हे वाण प्रसिद्ध होईल, असा विश्‍वास संस्थेच्या तज्ज्ञांनी व्यक्‍त केला.

‘बीजी-१’ या जीनचा अंतर्भाव असलेले दोन बीटी वाण ही संस्थेने विकसित केली आहेत. त्यामध्ये ‘बीटी-९’ आणि ‘बीटी-१४’ यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Cultivation: दरवाढीमुळे अद्रक लागवडीचे क्षेत्र वाढणार

Animal Cooling System: प्राण्यांसाठी विशेष ‘कूलिंग’ व्यवस्था

Rail Project Development: दौंड-वाडी लोहमार्गाचे चौपदरीकरण

SRT Farming Training: माती बलवान, तर पीक होईल पहिलवान

Sugarcane Payment Delay: ‘ट्वेंटीवन’कडून ऊसबिलाचे वाटप सुरू

SCROLL FOR NEXT