Cotton Sowing Agrowon
Image Story

Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

पारंपरिक पद्धतीत कपाशीमध्ये साडेतीन फूट (१०६.६८ सेमी) बाय एक फूट (३०.४८ से.मी.) लागवड अंतर राहते. (Cotton Sowing Method)

Team Agrowon

विकसित देशांची उत्पादकता (Cotton Production) ही भारताच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. या देशांमध्ये एकरी सुमारे ४० हजार झाडे बसतील अशा लागवड (Cotton Sowing) अंतर शिफारशी आहेत.

पारंपरिक पद्धतीत कपाशीमध्ये (Cotton) साडेतीन फूट (१०६.६८ सेमी) बाय एक फूट (३०.४८ से.मी.) लागवड अंतर राहते.

त्यानुसार एकरी १० हजार झाडे बसतात. मर व अन्य कारणांमुळे कमी झाल्यानं झाडांची संख्या सरासरी आठ हजार झाडे राहते. अतिसघन लागवड पद्धतीत एकरी झाडांची संख्या २९ हजार ठेवली जाणार आहे.

त्यासाठी दोन ओळींत ८० ते ९० सेंटिमीटर आणि दोन झाडांत १५ ते २० सेंटिमीटर अंतराची शिफारस केली आहे.

काही कारणामुळे या २९ हजारपैकी चार हजार झाडे मेली, तरी २५ हजार झाडे उत्पादनक्षम राहणार आहेत. त्यात एका झाडावर सरासरी दहा बोंड, प्रति बोंड चार ग्रॅम कापूस असा हिशेब धरला तरी एका झाडापासून ४० ग्रॅम कापसाचे उत्पादन होईल.

ही उत्पादकता एकरी सरासरी दहा क्‍विंटल पोहोचू शकते. सध्याच्या एकरी चार क्‍विंटल उत्पादनाच्या तुलनेत ती अडीचपट उत्पादन मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT