Water Tanker  Agrowon
ग्रामविकास

Mission Bhagirathi : जिल्हा टॅंकर मुक्तीसाठी ‘मिशन भगीरथी प्रयास’

मे महिना असो की, पाऊस लांबली की गावे आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते.

Team Agrowon

नाशिक : दरवर्षींचा दुष्काळ, पिण्यासाठी टॅंकरने (Water Tanker) पाणी पुरवठा (Water Supply) करणे हे जिल्ह्यातील दुष्काळी गावातील (Drought) चित्र पाटलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा संकल्प करत, ‘मिशन भगीरथी प्रयास’ (Mission Bhagirathi Prayas) हाती घेतले आहे.

या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील कायम पाणी टंचाई असलेल्या दुष्काळी गावांमध्ये २० ते २५ सिमेंट बंधारे बांधली जाणार आहेत.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून हे बंधारे बांधून, यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे सर्व पाणी गावात अडविले जाणार आहे. याबाबतचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे.

त्यासाठी अतिरिक्त मुख्य़कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी सर्व तालुका उपअभियंता यांची बैठक घेत, त्यांच्याकडून हा सुक्ष्म आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

यातच, सुरगाणा तालुक्यातील गुजरात समीवर्ती भागातील ५५ हून अधिक गावांना मूलभूत सुविधा यात प्रामुख्याने पाणी मिळत नसल्याने गुजरातला जोडण्याची मागणी केली असता, सुरगाणा तालुका सर्वांगीण विकासासाठी अॅक्शन प्लॅन बनविताना ठराविक गावांना पाणी नसल्याने टॅंकरनेच पाणी पुरवठा करावा लागत असल्याचे जिल्हा परिषदेच्या निर्दशनास आले.

सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही, धरणे असूनही काही गावांची तहान टॅंकरद्वारे भागवावी लागते. फेब्रुवारी महिना संपत नाही तोच, ग्रामीण भागातून टॅंकरची मागणी सुरू होते.

मे महिना असो की, पाऊस लांबली की गावे आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते.

जिल्हा परिषदेच्या मख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी यंदा टँकर मुक्तीचा संकल्प केला असून त्यासाठी भगीरथी प्रयास मिशन राबविली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT