cement bund built in the village and onion crop
cement bund built in the village and onion crop 
ग्रामविकास

शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात केंदूरची ओळख

sandeep navale

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी कांदा पिकात ओळख तयार केली आहे. शेतीतील प्रयोग, शेतकरी कंपनी, सामाजीक उपक्रम, जलसंधारण आदींच्या माध्यमातून गावाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. पुणे जिल्हयात शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्यात पंधरा हजार लोकवस्तीचे १२ वाड्यां-वस्त्यांमध्ये केंदूर गाव वसले आहे. भौगोलिक दृष्ट्या विचार करता मोठ्या असलेल्या या गावाचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. गावाविषयी

  • बहुतांशी भाग जिरायती. प्रामुख्याने खरीप मूग, बाजरी, कडधान्ये, भाजीपाला पिकांचे उत्पादन
  • एकूण क्षेत्र ४, ३६३ हेक्टर. पैकी ३२०० हेक्टरवर बागायती पिके.
  • सर्वाधिक क्षेत्र कांदा पिकाखाली. साधारणपणे १३५० हेक्टर.
  • मधुमका ५०० हेक्टर, खरीप मूग ९०० ते १००० हे. बाजरी ११०० हे. रब्बी ज्वारी ६०० हे. गहू २०० हे. भाजीपाला ५०० ते ६०० हेक्टर.
  • कांदा पिकासाठी ओळख खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ६० ते ७० टक्के क्षेत्रावर कांद्याची लागवड होते. शेतकरी साधारणपणे एकरी दहा ते बारा टनांपर्यंत उत्पादन घेतात. गावातीलच केंद्राईमाता शेतकरी कंपनीमार्फत कांद्याला बाजारपेठ देण्यात आली आहे. त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव, नवी बाजारपेठ, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविणे या उद्देशाने गावात केंद्राईमाता शेतकरी कंपनीची स्थापना जुलै, २०१५ मध्ये झाली. जागतिक बॅंकेच्या साह्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत गावातील सुमारे २२ शेतकरी गटांतील एकूण ४६२ शेतकरी त्यासाठी एकत्र आले. पाचशे टनांहून अधिक थेट विक्री चालू वर्षात या शेतकरी कंपनीने कांदा खरेदी केला. लॉकडाऊनच्या काळात रायगड, अलिबाग, महाबळेश्वर ,पेण आदी शहरांमध्ये प्रति किलो १३ ते १४ रुपये दराने विक्री केली. आत्तापर्यंत जवळपास ५०० टन विक्री साध्य झाली. ‘महाएफपीसी’ मार्फत नाफेडसाठीही कंपनीने कांदा खरेदी केली. परराज्यातही चेन्नई, दिल्ली बंगळूर, हैदराबाद, कोइमतूर व वेल्लोर या ठिकाणी प्रति किलो १७ ते १८ रुपये दराने विक्री करणे कंपनीला शक्य झाले. त्याचा कंपनीसोबत शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला. ज्यूट बॅगांची निर्मिती ज्यूटच्या बॅगा तयार करण्यासाठी सुरवातीला कुशल मजुरांची अडचण आली. मात्र हळूहळू गावातीलच मजुरांना तयार करण्यात आले. त्यासाठी ‘केंद्राईमाता’ कंपनीने पुढाकार घेतला. दोन यंत्रांद्वारे महिन्याला सुमारे तीस हजार बॅगा बनविल्या जातात. याव्यतिरिक्त हातशिलालाईद्वारे प्रत्येकी तीन मजुरांकरवी महिन्याला २७ हजार बॅगा बनवून विक्री केली जाते. कोरोना संकटानंतर मात्र कंपनीने शेतमाल विक्रीवर अधिक भर दिला आहे. कृषी विभागाच्या विविध योजना कृषी विभागामार्फत शेतकरी कंपनीतील विविध गटांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य, तृणधान्य, मूग, बाजरी पिकांची प्रात्यक्षिके, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत रब्बी ज्वारी, हरभरा यांसाठी बियाणे, खते, कीडनाशकांचे मोफत वाटप होते. वृक्ष लागवड व माती परिक्षण असे विविध उपक्रमही ल शेतकऱ्यांसाठी राबविले जातात. शेतकरी ते ग्राहक या तत्त्वावर काम महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री तत्त्वावर शहरी निवासी सोसायट्यांमध्ये फळे, भाजीपाला, धान्याची विक्री करण्यात आली. शासनाच्या मदतीने ‘फॅमिली पॅक’ बनवून पुणे, मुंबई येथील ग्राहकांना घरपोच देण्यास सुरवात केली. आत्तापर्यंत शेतकरी कंपनीमार्फत सुमारे २, ७०० हून अधिक फॅमिली पॅकची विक्री केली आहे. त्या अंतर्गत सुमारे ७०० क्विंटल भाजीपाला विक्री झाली. सव्वा ते दीड महिन्यात सुमारे ५० लाखांहून अधिक उलाढाल झाली. त्याचा आर्थिक लाभ गावातील शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन गावातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्या उद्देशाने शेतकरी कंपनी, ‘आत्मा’ यांच्यामार्फत सहलीचे आयोजन केले जाते. नाशिक जिल्ह्यातील ‘सह्याद्री’ शेतकरी कंपनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बारामती व नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रे, सिक्कीम, कोलकता, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाना, राजस्थान अशा विविध ठिकाणी संशोधन केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षणांचा लाभ घेतला आहे. जलस्तर वाढविण्यात गावकरी यशस्वी गावातील प्रशासकीय खात्यातील अतिरिक्त आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या सहकार्यातून गावात वर्षभरात १५ कोल्हापूर पध्दतीचे साखळी बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ‘यशदा’चे समन्वयक सुमंत पाडे, कविता शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. सुक्रेवाडी व कमळजाई ओढ्यावरील दोन्ही बंधारे आजमितीला पूर्ण भरले. तर १५ पैकी तीन बंधा-यांद्वारे सुमारे सव्वा दोनशे एकर क्षेत्र आठमाही ओलीताखाली आले. आपल्या गावचा सुमारे पाच फुटांपेक्षा जास्त जलस्तर वाढविण्यास ग्रामस्थ यशस्वी झाले. सामाजिक उपक्रम

  • 'आयटीसी अफार्म’ कंपनी मार्फत पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबविला. त्यामध्ये ४६८ हेक्टरवर समपातळी चर, दगडी बंधारे ,बांध बंदिस्ती, फळ लागवड, मातीचे व सिमेंट बंधारे, शेततळी यांचे काम पूर्ण.
  • 'आत्मा’ अंतर्गत शेतकऱ्यांकडील १०० एकरांवर कांदा, ९५ एकरांवर मधुमका पीक प्रात्यक्षिक
  • शेतकरी कंपनीतर्फे दरवर्षी आदर्श शेतकरी पुरस्कार
  • शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन, अभ्यास दौरे व कार्यशाळा
  • गावातील दोनशे सुशिक्षित महिला व पुरुषांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कार्यक्रम प्रशिक्षण
  • कृषी विभागाच्या सहकार्याने २५०० शेतकऱ्यांकडे मोफत माती परीक्षण
  • परिसरातील ५०० शेतकऱ्यांना मोफत झाडेवाटप.
  • भविष्यातील योजना

  • अवजारे बँक, कांद्यावर प्रक्रिया, चाळी उभारणे, परराज्यात विक्री केंद्र, निर्यात
  • हमी भावासाठी करार शेती
  • उत्तम गुणवत्तेचे बियाणे निर्माण करून शेतकऱ्यांना पुरविणे.
  • संपर्क- मंगेश गावडे- ९८५०७५४३९४ संदीप सुक्रे ९०११९९९७७६ (‘केंद्राईमाता’ कंपनी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

    Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    SCROLL FOR NEXT