mango, cashew orchardists Agrowon
फळबाग

Mango, Cashew : आंबा, काजू बागायतदारांचे उपोषण

कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, खावटी कर्जदारांचे कर्ज माफ करावे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बागायतदारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः दोन लाखांवरील कर्जदारांना कर्जमाफी मिळावी या मागणी जिल्ह्यातील आंबा (Mango) , काजू (Cashew) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी दिले आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ दोन लाखांवरील कर्जदारांना मिळालेला नाही. या निर्णयाचा मोठा फटका जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार कर्जदारांना बसला आहे. त्यामुळे या कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, खावटी कर्जदारांचे कर्ज माफ करावे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बागायतदारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. बागायतदार महादेव परब, श्यामसुंदर राय, सुरेश गावकर, अर्जुन नाईक, प्रभाकर सावंत, सुभाष भगत, अशोक सावंत आदी उपोषणास बसले होते. कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात कोविड काळात घेतलेली अल्प आणि मध्यम मुदतीची कर्जे शेतकऱ्यांना भरता आलेली नाही ती देखील माफ करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT