Dragon Fruit Agrowon
फळबाग

Dragon Fruit : देशात ५ हजार एकरांवर ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड

निर्यातीसाठी प्रयत्न सुरू; ५० हजार हेक्टर लागवडीचा विचार

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः देशात गेल्या तीन ते चार वर्षांपासून ‘ड्रॅगन फ्रूट’ची (Dragon Fruit) लागवड वाढू लागली आहे. सध्या देशात ५ हजार एकरांवर ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे. यंदा लागवड क्षेत्रात १ हजार एकराने वाढ होईल. देशातून ड्रॅगन फ्रुटच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुकर पोतदार यांनी दिली.

देशातील विविध राज्यात कोरडवाहू पट्ट्यासह दुष्काळ आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी पर्यायी पिकांची लागवड करत असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने डाळिंब, द्राक्षे ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना अतिपाऊस आणि दुष्काळ यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कमी पाण्यात आणि कमी खर्चात असणाऱ्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. महाराष्ट्रात १ हजार एकर, गुजरातमध्ये १ हजार एकर, तर मिझोराममध्ये १ हजार ५०० एकर क्षेत्र आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राजस्थान यासह अन्य राज्यांत १ हजार ५०० असे सध्या देशात ५ हजार एकर क्षेत्र आहे. यंदा राज्यात एक हजार एकरांनी क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे.

ड्रॅगन फ्रूटचा हंगाम मे पासून ते नोव्हेंबरपर्यंत असून पाच वेळा काढणी केली जाते. प्रामुख्याने देशांतर्गतच बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत ड्रॅगन फ्रुटला चांगली मागणी असते. त्यामुळे दरही अपेक्षित मिळतात. सध्या ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस ४० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत दर आहेत.

ड्रॅगन फ्रूटची देशात लागवड वाढवण्यासंदर्भात केंद्रात नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत देशात ५० हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याबाबत अजूनही ठोस नियोजन झालेले नाही. या संदर्भात प्रत्येक राज्याशी चर्चा केली जाईल, अशी माहिती ड्रॅगन फ्रूट असोसिएशनने दिली.


लागवडीसाठी अनुदान
राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूट लागवड वाढीसाठी ठोस पावले उचलली आहेत. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान जाहीर केले आहे. हेक्टरी १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान आहे. त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. १ लाख ६० हजार रुपये अनुदान तीन वर्षात पहिल्या वर्षी ६० टक्के आणि पुढच्या दोन वर्षी प्रत्येकी २० टक्के याप्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. यामुळे राज्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढण्याची शक्यता आहे.

देशात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत आहे. आरोग्यास फायदे असल्याने मागणीही चांगली आहे. सध्या देशांतर्गतच याची विक्री होत आहे. आता ड्रॅगन फ्रूटची निर्यात करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत.
- डॉ. मधुकर पोतदार, अध्यक्ष,
महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT