health benefits of Jeshthamadh
health benefits of Jeshthamadh 
औषधी वनस्पती

आरोग्यदायी ज्येष्ठमध

डॉ. विनीता कुलकर्णी

समस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही.  मुखशुद्धीकर म्हणून सुपारी तयार करताना, लहान बाळाच्या गुटीत उगाळून चाटण करताना जेष्ठमधाचा वापर केला जातो. जेष्ठमधाच्या काड्या किंवा पावडर बाजारात उपलब्ध होते. उगाळून द्यायचे असल्यास काडीचा उपयोग केला जातो. कोणत्याही काष्ठौषधीच्या दुकानात जेष्ठमध काढा मिळतो. आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर मध्ये पावडर सहज उपलब्ध होते. प्रत्येक घरात जेष्ठमध पावडर असायलाच पाहिजे  इतके आरोग्यदायी गुणधर्म जेष्ठमधात असतात.

  • आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर जेष्ठमध पावडर १/४ चमचा या प्रमाणात  चघळावी आणि गरम पाणी प्यावे.
  • कोरडा खोकला आणि रात्री ढास लागत असेल तर सितोपलादी चूर्ण आणि जेष्ठमध पावडर प्रत्येकी १/४ चमचा या प्रमाणात एकत्र करून मधासह घ्यावी. खोकला कमी होतो. खूपच कोरडी ढास असेल तर तुपासह चाटण करून सेवन करावे.
  • नवजात बाळासाठी ज्येष्ठमधाची काडी मधामध्ये उगाळून चाटवल्यास फायदा होतो.मात्र याची मात्रा  तज्ञांना विचारून ठरवावी.
  • खूप तिखट चमचमीत अन्न सेवन केल्यास उष्णता वाढून तोंड येते. अशावेळी जेष्ठमध पावडर तुपात मिसळून लावावी. यामुळे  आग कमी होते.
  • अनेकांना  मूळव्याधीचा त्रास असतो. शौचाच्या वेळी  आग होणे, रक्त पडणे अशा तक्रारी दिसतात. यासाठी नियमित औषधे आणि पथ्य पालन करणे आवश्‍यक आहे. तसेच यासोबत अर्धा चमचा जेष्ठमध पावडर तुपासह जेवणाआधी घेतल्यास आग कमी होण्यास मदत होते. जोडीला नागकेशर, चंद्रकला वटी यांचा तज्ञांच्या सल्ल्याने उपयोग केल्यास फायदा होतो. 
  • उन्हात काम केल्याने, पाणी कमी सेवन केल्याने उन्हाळे लागतात आणि मूत्र विसर्जनावेळी आग होते.  अशावेळी जेष्ठमध खडीसाखर आणि तूप एकत्र करून चाटण घ्यावे.   पाणी भरपूर प्यावे. तज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावा.
  • उष्णतेमुळे शौचाच्या जागी आग होत असल्यास, ज्येष्ठमध चूर्ण तुपात किंवा लोण्यात घालून त्याजागी लावावे.
  • पथ्य  जास्त तिखट, तळलेले, मिरची, पापड अशा पदार्थांचे सेवन केल्याने उष्णता वाढते. त्यामुळे त्यांचे सेवन करणे टाळावे.  आंबट थंड ताक, दही, दही अधिक काकडी,  दूध अधिक केळी,  थंड पाणी यामुळे कफ वाढतो. म्हणून अशा गोष्टींचे सेवन करणे वर्ज्य करावे. काळजी

  • वारंवार शौचाद्वारे रक्त पडणे, तोंड येणे अशा तक्रारी सतत होत असल्यास डॉक्टारांच्या सल्याने योग्य औषधोपचार घ्यावा.
  • कफ जास्त असेल,  ताप असेल, श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, आडवे झोपल्यावर कप अधिक वाढत असेल तर तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून उपचार घ्यावेत.
  • (टीप - जेष्ठमधाचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.) संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९९२२३१०३३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT