ginger 
औषधी वनस्पती

भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्त

जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे ही भूक मंदावण्याची लक्षणे आहेत. या आजारावर सुंठ, जिरे, ओवा, चित्रक, पिंपळी या वनस्पतींचा वापर महत्त्वाचा ठरतो.

डॉ. सुधीर राजूरकर

जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे ही भूक मंदावण्याची लक्षणे आहेत. या आजारावर सुंठ, जिरे, ओवा, चित्रक, पिंपळी या वनस्पतींचा वापर महत्त्वाचा ठरतो.

अपचन, पोट गच्च होणे, पोटदुखी यांसारखे पोटाचे आजार जनावरांमध्ये बऱ्याच वेळा आढळतात. जनावरांच्या खाद्यातील बदल, संगोपनातील चुका, गोठ्यातील अस्वच्छता, संक्रमक आजार अशा विविध कारणांमुळे पोटाचे आजार होतात. या आजारांमध्ये जनावर खाद्य खात नाही. सुरुवातीस अगदी किरकोळ वाटणारा हा आजार वेळीच उपचार न केल्यास त्रासदायक ठरतो. कारण अशा आजारांमध्ये सर्वांत आधी परिणाम होतो तो जनावरांच्या खाद्य खाण्याच्या इच्छेवर. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो, जनावर रोड होते आणि पर्यायाने त्यापासून मिळणारे उत्पादन कमी अथवा बंद होते. लक्षणे ः जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे. उपचारासाठी वनस्पती  

  • भूक मंदावणे या आजारावर उपचार करताना आपल्या माहितीच्या व आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींचा वापर करता येतो. उदाहरणार्थ सुंठ, जिरे, ओवा, काळे मीठ, चित्रक, पिंपळी. 
  • आले, सुंठ 

  •  अन्नपचन होण्यासाठी पोटात अन्नावर विविध अभिक्रिया होतात.
  • अन्न खाल्ल्यानंतर तोंडात दाताद्वारे ते बारीक होते. सोबतच त्यात लाळ मिसळली जाते. याच प्रमाणे अन्न पोटात गेल्यानंतर त्यामध्ये शरीरात तयार होणारे विविध पाचक रस मिसळले जातात.
  •  आले ही वनस्पती अन्नपचनास मदत करणारी आहे. अन्नाच्या पचनाच्या प्रक्रियेमध्ये पोटामध्ये पाचक रस तयार होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या पाचक रसांची कमतरता किंवा असे पाचक रस तयार न झाल्यास अन्नपचन नीट होऊ शकत नाही. या पाचक रसांची निर्मिती करण्याचे काम सुंठीमुळे होते. 
  •  जिरे 

  •  अन्नपचनाच्या प्रक्रियेत विविध पाचक रसांची निर्मिती होण्यासाठी जिरे या वनस्पतीचा अत्यंत चांगला उपयोग होतो. 
  •  पोटाची हालचाल नियमित होणे हे पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. ही हालचाल कमी झाल्यास पोट गच्च होते. जनावरास पातळ संडास होते, म्हणजेच अपचन होते. 
  •   अपचनाच्या दोन्ही प्रकारांत भूक कमी होते. यसाठी जिरे उपयुक्त आहे.
  • ओवा 

  •  ओवा आणि जिरे यांच्या वापरामुळे पोटाची व आतड्यांची मंदावलेली हालचाल वाढते. नियमित होते. यामुळे अन्नाचे पचन होऊन पोटाचे आजार कमी होतात.  
  • पिंपळी

  •  पोटाची हालचाल नियमित करणे, अन्नपचनास मदत करणे, तसेच या दरम्यान तयार होणरा गॅस याची मात्रा नियमित करण्यासाठी पिंपळी या वनस्पतीचा उपयोग होतो.
  • पोटाच्या आजारात या वनस्पतीचा उपयोग अत्यंत चांगला होतो. 
  • पिंपळी या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात. 
  • काळे मीठ 

  • काळे मीठ ही वनस्पती नाही. परंतु पोटाच्या आजारात अत्यंत उपयुक्त असलेले हे औषध आयुर्वेदात सांगितले आहे.
  • काळे मीठ वापरानंतर पोटात जमा झालेली हवा म्हणजेच गॅस कमी होतो. 
  • पोटात हवा जमा झाली तर अपचन होऊन जनावर खाद्य खात नाही. अशावेळी अत्यंत खात्रीचा उपाय म्हणजेच काळे मीठ.
  • टीप ः या लेखात दिलेल्या सर्व वनस्पती एकत्र करून वापरल्यास याचा चांगला उपयोग होतो. परंतु काही कारणास्तव काही वनस्पती जर आपल्याला मिळाल्या नाहीत, तर ज्या वनस्पती उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. या लेखात सांगितलेली प्रत्येक वनस्पती एकटी वापरली तरीदेखील ती  उपयुक्त ठरते.

    - डॉ. सुधीर राजूरकर,  ९४२२१७५७९३ (प्राध्यापक, पशू औषधी व विषयशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

    AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

    Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

    Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

    Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

    SCROLL FOR NEXT