Animal Care Agrowon
ॲनिमल केअर

Animal Care : जनावरांतील पोटफुगीवर उपाययोजना

कोवळे हिरवे गवत जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोटफुगीचा त्रास सुरू होतो. जनावरांचे डाव्या बाजूचे पोट फुगते.

टीम ॲग्रोवन

डॉ. कल्याणी सरप, डॉ. सय्यद शाकिर अली

कोवळे हिरवे गवत (Green Fodder) जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोटफुगीचा (Stomach Bloating) त्रास सुरू होतो. जनावरांचे डाव्या बाजूचे पोट फुगते. पोटातील वायूचे प्रमाण वाढल्याने पोटाची डावी बाजू वर येते. यामध्ये रोमन्थिकामध्ये जास्त प्रमाणात वायू साठल्याने पोट फुगते, जनावरे अस्वस्थ होतात. (Animal Stomach Bloating)

जनावरांमधील पोटफुगीचे प्रकार ः

१) प्राथमिक अवस्थेतील पोटफुगी आहारातील बदलामुळे होत असते. आहारात सुक्या चाऱ्याचे कमी प्रमाण आहारातील अचानक बदल यांचा समावेश होतो. द्वितीय अवस्थेतील पोटफुगी वायू शरीराबाहेर न टाकल्यामुळे होत असतो. जनावरांच्या रोमन्थिकेत चारा आंबविण्याच्या क्रियेमुळे सतत वायू तयार होतो. हा वायू नैसर्गिक क्रियेने बाहेर पडत असतो. परंतु जर रोमन्थिकेत फेस तयार झाला, तर त्यामध्ये वायू अडकल्यामुळे तो बाहेर पडू शकत नाही किंवा कधी कधी दोषयुक्त आहारामुळे वायू तयार होण्याचे प्रमाण अधिक वाढते.

२) अन्ननलिकेत काही अन्नघटक फसून राहिल्याने, खाद्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने दिसून येते. पोटात तयार झालेला वायू बाहेर न पडल्यास, तो पोटातच अधिक काळ साचून राहिल्याने, जनावरांचे डावीकडील पोट फुगलेले दिसून येते. त्या ठिकाणी हात मारल्यास विशिष्ट प्रकारचा आवाज घुमतो. पोटदुखी होते, जनावर वारंवार लघवी आणि शेण टाकते. श्‍वास घेण्यास त्रास होतो. परिणामी, जनावर तोंड उघडून मान वर करून श्‍वास घेण्यास सुरुवात करते. कोठीपोटाची हालचाल कमी होते. जनावर बैचेन होते. चारा खाणे, पाणी पिणे बंद होते. यामुळे वेदनाही होतात.

लक्षणे :

१) जनावरांचे पोट डाव्या बाजूकडून फुगते. पोट फुगलेली जनावरे अस्वस्थ दिसतात. ऊठबस करतात. रवंथ करणे बंद करतात. पोटावर लाथा झाडतात किंवा जमिनीवर लोळतात. तोंडावाटे श्‍वास घेतात. जीभ बाहेर काढतात. जनावरांची लाळ गळत असते. पोटावर डावीकडे ठोकल्यास आवाज येतो.

उपाय योजना ः

१) आहारात जास्त प्रथिने असलेल्या चाऱ्याचा समावेश कमी करावा. भरडलेल्या धान्याचा आहारातील समावेश कमी करावा.

२) आहारात तंतुमय पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा. असे केल्याने जनावरांना चयापचय क्रियेत मदत होते. उपाय म्हणून पोटाच्या डाव्या बाजूला मसाज करावा.

३) पोटफुगी दिसून आल्यावर जनावरास उंच जागेवर उभे करावे. जनावरांना वायू बाहेर पडण्यास मदत होईल अशा क्रिया कराव्यात. पोटफुगीचे प्रमाण जास्त असल्यास पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करावेत.

- डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५०

(विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन). कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: मोदी, शहा हे गद्दार; त्यांनी देश विकला : राहुल गांधी

Heatstroke Cases: उष्माघाताचे राज्यात २१९ रुग्ण

India Growth Rate: भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवर

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

Brazil Ethanol Production: ब्राझीलचा इथेनॉल उत्पादनावर भर

SCROLL FOR NEXT