What type of feed should be give to animals during late pregnancy? 
कृषी पूरक

गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त कॅल्शिअम देऊ नये ?

गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यात जेव्हा गाय किंवा म्हैस दूध देणे बंद करते. तेव्हा ती कासेची आणि शरीराची पुढील वेतासाठीची तयारी करत असते. या काळात गाय-म्हैस दुधाचे उत्पादन देत नसेल तरीही, योग्य आहार व्यवस्थापन करून सुलभ प्रसुती होणे गरजेची आहे.

टीम अॅग्रोवन

गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यात जेव्हा गाय किंवा म्हैस दूध देणे बंद करते. तेव्हा ती कासेची आणि शरीराची पुढील वेतासाठीची तयारी करत असते. या काळात गाय-म्हैस (cow-buffalo) दुधाचे उत्पादन देत नसेल तरीही, योग्य आहार व्यवस्थापन (feed mangement) करून सुलभ प्रसुती होणे गरजेची आहे. हेही पाहा- शेपटाकडे शेपूट किंवा तोंडाकडे तोंड पद्धत

या काळात जनावरांना कमी पोटॅशियम (potasium)आणि सोडियम (Sodium) असलेला आहार द्यावा. मात्र मॅग्नेशियमचे (magneshiyam) प्रमाण वाढवावे. जनावरांच्या आहारातील मीठ आणि सोड्याचा वापर कमी करावा. यामुळे रक्ताचा सामू आम्लधर्मी राहण्यास मदत होईल. गाभण काळात कमी कॅल्शिअम व जास्त मॅग्नेशिअम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी. हेही वाचा- मासे टिकविण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जातात? गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिला गेल्यास तो शरीरात शोषला जाण्याची क्रिया कमी होते. कारण या काळात दुधाचे उत्पादन मिळत नसल्यामुळे कॅल्शिअम शरीरात शोषून घेण्याचे कार्य मंदावते. आणि याचा फटका गायीला किंवा म्हशीला व्यायल्यावर बसतो. परिणामी दुधाचा ताप हा आजार होण्याची शक्यता वाढते. हेही वाचा- गांडूळांच्या जीवनातील अवस्था कोणत्या असतात? गाभण काळाच्या शेवटच्या ३ महिन्यात गर्भाशयातील वासराची सुमारे ६५ टक्के वाढ होते. त्यामुळे गाभण काळात प्रथिनांबरोबर ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी  ऊर्जायुक्त पूरक आहार द्यावा. या काळात प्रकृती अंक म्हणजे बॉडी स्कोअर ३.५ ते ४ च्या दरम्यान हवा. त्यामुळे व्यायल्यानंतर होणारा दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर, किटोसीस यांसारखे आजार होत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Intergrated Farming: जिद्द, चिकाटीतून केली एकात्मिक शेती यशस्वी

Vedkasturi Tourism Centre: जुन्नरची वैभवशाली संस्कृती जपणारे वेदकस्तुरी पर्यटन केंद्र

Rural Divorce Issue: ग्रामीण भागात का वाढताहेत घटस्फोट?

Agricultural Research: सामंजस्य करारातून समन्वय वाढवा

Kisan Sabha Farmer Protest: किसान सभेचे राज्यभर ‘जेल भरो’

SCROLL FOR NEXT