Land Survey Agrowon
कृषी पूरक

खेड तालुक्यात गावठाण मोजणीला सुरुवात

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत खेड तालुक्यात गावठाण मोजणीला सुरुवात झाली.

टीम ॲग्रोवन

पुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत खेड तालुक्यात गावठाण मोजणीला (Village Land Survey) सुरुवात झाली. तालुक्यातील पूर, कनेरसर, वरुडे गावची मोजणी पूर गावच्या सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते ड्रोनचे उड्डाण करून मॅपिंग करण्यात आले.

भारतीय सर्वेक्षण विभाग, भूमी अभिलेख, ग्रामविकास विभाग (Rural Development) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे स्वागत सर्व ग्रामपंचायतींनी केले आहे. प्रत्येक गावात गावठाणांतर्गत असणाऱ्या जागा माहिती नसल्याने अतिक्रमण झाले आहे. राजकीय मतांची बेरीज जुळवण्यासाठी कोणीही पदाधिकारी मनावर घेत नसे; मात्र या योजनेतून गावठाण हद्द व त्या अंतर्गत असणाऱ्या जागा निश्चित होणार आहे. यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना धक्का बसला, तर ज्यांना जागा मिळणार आहे, त्यांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये प्रथम गावठाण हद्दीसाठी चुन्याने खुणा करण्यात आल्या, त्यानंतर ड्रोन उड्डाण करून एकाच वेळी तिन्ही गावांचे सर्वेक्षण अवघ्या २० मिनिटांत करण्यात आले.

ग्रामपंचायतीकडून ‘८ अ’ घेऊन तीन महिन्यांनंतर प्रत्येकाच्या जागा मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार व गावठाण हद्द निश्चित करणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले. या वेळी उपसरपंच नामदेव गावडे, सदस्य किशोर सावंत, लताताई गावडे, किरण गावडे, संगीता गावडे, रूपाली गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT