Animal Care 
कृषी पूरक

जनावरांना चालताना त्रास का होतो?

रिंगणी हा आजार नसून ती एक व्याधी आहे. आजतागायतच्या संशोधनावरून अस दिसून आलंय कि क्षार मिश्रणाच्या कमतरतेमुळे जनावरांना रिंगणी होते.

टीम अॅग्रोवन

रिंगणी हा आजार नसून ती एक व्याधी आहे. आजतागायतच्या संशोधनावरून अस दिसून आलंय कि क्षार मिश्रणाच्या कमतरतेमुळे जनावरांना रिंगणी होते. यावर कोणतेही औषधउपचार नसून फक्त शस्त्रक्रियेद्वारे जनावर बरे होऊ शकते. 

रिंगणी व्याधी होण्यासाठी कारणीभूत घटक -

  • जनावरांमध्ये  रिंगणी होण्यास पटेला नावाची अस्थी कारणीभूत असते.
  • जनावरात एकूण तीन प्रकारच्या पटेला असतात त्यांतली मेडिअन पटेला ताठर झाल्यास रिंगणी होते.
  • पटेला अस्थी ही सीसमॉईड जातीची अस्थी असून ती लहान वासरांमध्ये आकाराने खूप लहान असते. वयानुसार तिचा आकार हळूहळू वाढत असतो. एक विशिष्ट आकार प्राप्त केल्यानंतर तिची वाढ थांबते.
  • या व्याधीमध्ये सांध्याची हालचाल करताना जनावराला त्रास होतो, परिणामी जनावर लंगडत चालते.
  • आता लक्षणे पाहुया-

  • जनावरांच्या मुख्यतः मागील पायामध्ये रिंगणी आढळून येते.
  • रिंगणीमध्ये जनावरांची चाल ही सामान्य राहत नाही, मागील पायाची हालचाल असामान्य होते.
  • मागील पायामध्ये गुडघ्याच्या वरील म्हणजे कासेच्या बाजूच्या सांध्यामध्ये हा प्रकार पहावयास मिळतो. 
  • जनावर पाय बाहेरून काढते. जनावरांना चालण्यास अडचण होते.
  • आजाराची तीव्रता अधिक प्रमाणात असल्यास जनावर जागेवरून हलण्यास निर्बंध येतात.
  • मागील पाय उचलून पुढे टाकण्याची क्षमता कमी झाल्याने खुर जमिनीला घासले जातात, परिणामी खुरांतून रक्तस्त्राव होतो.
  • सकाळी उठल्यावर बैल मागील पायाला झटका मारू लागतो यामध्ये कामाच्या बैलाचा वापर शेतीच्या कामासाठी करता येत नाही.
  • शस्त्रक्रिया करण्याची पद्धत   -

  • खुली पद्धत – यामध्ये जनावर जमिनीवर आडवे पाडले जाते. शस्त्रक्रिया करण्याच्या जागेवर भूलीचे इंजेक्शन दिले जाते. तिन्ही लीगामेंटची तपासणी करून मधल्या लीगामेंटला कापले जाते.
  • बंध पद्धतीमध्ये – उभ्या जनावरांमध्ये भुलीचे इंजेक्शन देऊन लीगामेंट हाताने अनुभवून मेडिअन पटेला अस्थी तोडली जाते. ही शस्त्रक्रिया शेतकऱ्यांच्या दारी जाऊनही करता येते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

    Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

    Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

    Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

    SCROLL FOR NEXT