japanese quail 
कृषी पूरक

Bater Palan : कमी भांडवलातील बटेर पालन

कोंबडीपालनासाठी लागणाऱ्या भांडवलापेक्षा कमी भांडवलात बटेरपालन व्यवसाय सुरू करता येतो. सद्यःस्थितीत'जापनीज क्वेल'या बटेर प्रजातीचे पालन केले जाते. बटेर पक्ष्याच्या मादीचे वजन (१५० ते १६० ग्रॅम) नरापेक्षा (१३० ते १४० ग्रॅम) जास्त असते.

टीम अॅग्रोवन

कोंबडीपालनासाठी (Poultry Farming))लागणाऱ्या भांडवलापेक्षा कमी भांडवलात बटेरपालन व्यवसाय सुरू करता येतो. सद्यःस्थितीत 'जापनीज क्वेल' (Japanese Quail) या बटेर प्रजातीचे पालन केले जाते. बटेर पक्ष्याच्या मादीचे वजन (१५० ते १६० ग्रॅम) नरापेक्षा (१३० ते १४० ग्रॅम) जास्त असते. पक्ष्यांच्या शरीरावरील पिसाचा रंग तपकिरी असून, त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. नर पक्ष्याच्या छातीच्या वरच्या भागावर तपकिरी रंगाची पिसे व त्यावर काळपट रंगाचे ठिपके असतात. यावरून तिसऱ्या आठवड्यात नर व मादीतील फरक सहज ओळखता येतो.

संगोपन

-    बटेर पक्ष्यांचे संगोपन पिंजरा व डीप लिटर पद्धत (Deep Liter) वापरून चांगल्या प्रकारे करता येते. गादी पद्धतीपेक्षा पिंजरा पद्धतीमध्ये (Cage System)पक्षी वाढविल्यास फायदा अधिक होतो. पिंजरा पद्धतीत प्रतिपक्षी जागा कमी लागते. खाद्याची नासाडी टाळता येते. रोगांचा प्रसार कमी होतो. स्वच्छ अंडी मिळतात.

हेही वाचा- अंडी उत्पादनाला कोणती कोंबडी चांगली?

-    पिंजरे ठेवण्यासाठी देखील निवाऱ्याची (शेडची) आवश्यकता असते. तेव्हा पक्ष्यांची व पिंजऱ्यांची संख्या विचारात घेऊन घरे उभारावीत. घराच्या लांबीची बाजू दक्षिणोत्तर तोंड करून व पक्ष्यांच्या क्षमतेनुसार असावी. 

वैशिष्ट्ये

-    या व्यवसायाला भांडवल कमी लागते.

-    आर्थिक मिळकत लवकर सुरू होते.

-    जागेची आवश्यकता कमी असते.

-    इतर पक्ष्यांच्या तुलनेत बटेर पक्ष्याची रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे. त्यामुळे लसीकरण व औषधी उपचारांवरील खर्च कमी येतो.

-    हा पक्षी काटक असल्यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात वाढू शकतो.

-    पक्ष्यांना खाद्य कमी लागते. वाढ जलद होते.

-    पक्षी लवकर वयात येतो. त्यांच्या दोन पिढ्यांमधील अंतर कमी असते.

-    अनुकूल हवामानात पाच ते सहा आठवड्यांत मांसल पक्षी तयार होतो.

-    अंड्यावरील पक्षी वर्षाकाठी २८० ते ३०० अंड्यांचे उत्पादन देतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT