lets see details about Animal aadhar card 
कृषी पूरक

जनावरांचे आधार कार्ड

पशुधन विषयक माहिती संबंधित एक प्रचंड डेटा बेस भारत सरकार तयार करीत आहे. पशुधनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार पुढील दिड वर्षात जवळपास ५० कोटींपेक्षा अधिक गायींच्या मालकांना एक विशेष आयडी दिला जाणार आहे.

टीम अॅग्रोवन

पशुधन विषयक माहिती संबंधित एक प्रचंड डेटा बेस भारत सरकार तयार करीत आहे. पशुधनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार पुढील दिड वर्षात जवळपास ५० कोटींपेक्षा अधिक गायींच्या मालकांना एक विशेष आयडी दिला जाणार आहे. भारतामध्ये जनावरांची टॅगिंग (Tagging) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक गायी आणि म्हशींसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Identification Numberलागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा असा होईल की,  पशुपालक आपल्या घरी बसून सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या जनावरांविषयी माहिती प्राप्त करू शकतात तसेच   जनावरांचे लसीकरण (Vaccination), चिकित्सा इत्यादी सगळ्या प्रकारची कामे करणे फार सोपे होणार आहे. जनावरांच्या कानात ८ ग्रँम वजनाचा एक पिवळा टॅग घातला जाईल ज्यावर १२ अंकी एक विशिष्ट आधार क्रमांक असेल.

पॉली युरीथीनपासून बनवलेला हा टॅग हेळसांड न होणारा असेल. वर्षानुवर्षे टिकणारा हा टॅग असेल. संबंधित गाय किंवा म्हशीला एकदा टॅगिंग केल्यानंतर संपूर्ण माहिती संगणकात भरली जाणार असून, संबंधित जनावराची विक्री झाल्यानंतरही नवीन ठिकाणी या जनावरासंदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. गायी – म्हशीनंतर शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठीही हे आधार कार्ड तयार करण्यात येणार आहे.  

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनावरांची ओळख व नोंदणी, कृत्रिम रेतन नोंदणी, दुध उत्पादनाच्या नोंदी, पशु आहार संतुलन, पशुस्वास्थ्यामध्ये उपचार, रोगनिदान, तपासणी, लसीकरण व प्रादुर्भावाच्या नोंदी घेणे, पशुपालकांना पशु सल्ला देणे शक्य होणार आहे.

हेही वाचा- तुमच्या पशुची ‘ई-गोपाला’ अॅपवर नोंदणी केलीय का?  

फायदे

  • जनावरांचे वय ओळखणे सोपे जाते.
  • जनावरांची जात ओळखणे सोपे जाईल.
  • जनावर कोणत्याही आजारातून गेलेला असल्यास नोंद पाहणे सोपे जाते.
  • खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जनावरांचा मालकी हक्क दाखविण्यासाठी याचा उपयोग करता येणार आहे.
  • पशु आधारामुळे कोणत्याही राज्यात जनावर गेल्यास कुठल्याही प्रकारचे आजार निर्माण झाल्यास वेळेत आजाराचे निदान होऊन उपचार करणे शक्य होणार आहे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

    Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

    Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

    Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

    Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

    SCROLL FOR NEXT