Agriculture Business
Agriculture Business Agrowon
कृषी पूरक

Agriculture Business : स्वॉट ॲनालिसिसने ओळखा व्यवसायातील बलस्थाने

Team Agrowon

स्वॉट ॲनालिसिसचा (swot analysis) उपयोग व्यवसायात जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, व्यवसायातील धोके कमी करण्यासाठी व वेगवेगळ्या संधींचा आवश्यक फायदा घेण्यासाठी अग्रक्रमाने होतो. स्वॉट (SWOT) अॅनालिसिस म्हणजे आपण जो व्यवसाय करतो त्याची बलस्थाने (Strength), कमजोर बाजू (Weakness), उपलब्ध संधी (opportunity ) आणि संभाव्य धोके (Threats) या सर्वांचे विश्लेषण करणे होय. स्वॉट अनालीसीसच्या सहाय्याने कृषी व्यवसायामधील बलस्थाने व कमजोर बाजू ओळखून उपलब्ध संधी आणि संभाव्य धोके यांचे परीक्षण करू शकतो. प्रथम आपल्या कृषी व्यवसायातील बलस्थाने कशी ओळखायची याविषयी  माहिती पाहुया.

आपल्या व्यवसायाचे सर्वोत्तम उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवसायातील बलस्थानावर जास्तीत जास्त लक्ष द्यावे. बलस्थानांची यादी करावी व यासंबधित सर्व माहिती संकलित करून पुढील धोरण तयार करावे. त्यानंतर पुढील नियोजन असे करावे, जेणेकरून व्यवसायातील बलस्थाने व उपलब्ध संधी यांचा चांगला फायदा घेता येईल तसेच कमजोर बाजू कमी होतील व संभाव्य धोके टाळता येतील.  

व्यवसायातील बलस्थाने कशी ओळखायची?

काय केल्याने आपला कृषी व्यवसाय चांगल्या रीतीने चालेल? (थेट विपणन, अतिरिक्त प्रक्रिया, प्रतवारी इ.)

इतर लोक काय करतात ? (शेजारचा शेतकरी, इतर स्पर्धक व्यक्ती) त्याप्रमाणे तुमची बलस्थानेओळखली का ? (उत्पादनाची गुणवत्ता, अतिरिक्त सेवा इ.)   

कृषी व्यवसायात तुमचे जास्तीत जास्त लक्ष कशावर आहे? (तुमच्या व्यवसायातील उत्पादन )

तुमच्या कृषी व्यवसायाचा बाजारातील वाटा किती आहे?

तुमच्या कृषी व्यवसायाची विपणन व जाहिरात व्यवस्था प्रभावी आहे का? 

ग्राहक तुमची उत्पादने विकत का घेतो? 

तुमचे उत्पादन व बाजारा मधील इतर स्पर्धात्मक उत्पादने यातील फरक काय आहे?

तुमची व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरी कोणती? 

तुमच्या कृषी व्यवसायाशी संबधित आवश्यक साधनसंपत्ती आहे का? व अतिरिक्त साधनसंपत्ती कोणती आहे?

तुमच्या कृषी व्यवसायातून मिळणाऱ्या महसूल व नफ्याचे मुख्य स्रोत कोणते ?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT