how to construct Poultry shed for hen rearing? 
कृषी पूरक

कोंबड्यांच्या शेडचे बांधकाम कसे असावे?

पोल्ट्री शेडची लांबी नेहमी पूर्व-पश्चिम बांधावी. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी सर्वसाधारणपणे १८ ते २५ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. शेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे.

टीम अॅग्रोवन

पोल्ट्री शेडची लांबी नेहमी पूर्व-पश्चिम (East-West) बांधावी. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी सर्वसाधारणपणे १८ ते २५ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. शेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि काहीशी उंच जागी असावी. शेडच्या आसपास जास्त ओल असू नये. ओल आल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. शेडच्या भोवती झाडे असावीत. यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होतो. हेही वाचा- गिरिराज कोंबडी देते इतक्या अंड्याच उत्पादन

शेड बांधलेल्या ठिकाणी पाण्याची (Water) आणि विजेची (Electricity) सुविधा असावी. शेडची रुंदी साधारणपणे २० ते ३० फूट असावी आणि उंची साधारणपणे ७ ते १० फूट इतकी असावी. शेडची लांबी एकूण पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असते. बहुतेक शेडला मध्य भागातून दोन्हीकडे उतरते छप्पर बसवतात. त्यांचा उतार एक चतुर्थांश वा एक तृतियांश असावा. छपराच्या बाजूचा भाग भिंतीच्या बाहेर अधिक यावा, जेणेकरून बाजूने येणारा पाऊस आत येणार नाही, पुरेशी सावलीही राहील.

शेडचा पाया मजबूत असावा. सिमेंट (Cement) काँक्रीटचा पाया उत्तम असतो. शेडमधील जमीन सिमेंट काँक्रीटसारखी पक्की असावी. शेडच्या दरवाजाची रुंदी २.५ फूट आणि उंची ६ फूट असावी. हेही वाचा- अंडी उत्पादनाला कोणती कोंबडी चांगली? शेडच्या दोन्ही बाजू निम्म्या उघड्या ठेवाव्यात. उघड्या ठिकाणी तारेची शेडच्या दोन्ही बाजूस हिवाळ्यात प्लॅस्टिकचे किंवा पोत्याचे पडदे लावावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Return Monsoon Forecast: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

Food Grain Production: रब्बीमध्ये १७७७ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT