Phosphorus Deficiency in Buffalo 
कृषी पूरक

म्हशींमध्ये स्फुरद कमतरतेमुळे होतो लाल मुत्र आजार

म्हशींमध्ये लालमुत्र किंवा पोस्ट पार्च्यूरियंट हिमोग्लोबिनयुरिया हा उत्पादकतेशी निगडीत आजार स्फुरदच्या कमतरतेमुळे दिसून येतो.

टीम अॅग्रोवन

म्हशींमध्ये लालमुत्र किंवा पोस्ट पार्च्यूरियंट हिमोग्लोबिनयुरिया हा उत्पादकतेशी निगडीत आजार स्फुरदच्या कमतरतेमुळे दिसून येतो. हा आजार प्रामुख्याने ५-१० वर्ष वयोगटातील, तिसऱ्या ते सातव्या वेतातील म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. गाभणकाळातील शेवटचे ३ महिने किंवा विल्यानंतरचे पहिले १-२ महिने या कालावधीत या आजाराचं जास्त प्रमाण आढळून येते. म्हशी प्रामुख्याने हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर वितात त्यामुळे डिसेंबर ते जुलै या कालावधीदरम्यान आपल्या राज्यात लाल मूत्र आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

म्हशींमध्ये लाल मुत्र आजार होण्याची कारणे - आहारातील स्फुरदची कमतरता हे लाल मुत्र आजाराचे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत मातीत स्फुरदचे प्रमाण कमी असून, अशा मातीमधील गवत किंवा चारावर्गीय पिकांमध्ये स्फुरदचे प्रमाण कमी असते. तसेच वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी असते. हिरव्या चाऱ्यातील व खुराकमधील स्फुरदचे प्रमाण हे वाळलेल्या चाऱ्यातील स्फुरदच्या तुलनेत अनुक्रमे २-३ आणि ४ पटीने जास्त असते. जर शेवटच्या टप्प्यातील गाभण आणि नवीन विलेल्या म्हशींच्या आहारात जास्त काळ वाळलेला चारा दिल्यास किंवा आहारात खुराक आणि हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास किंवा आहारात या घटकांचा समावेश नसल्यास जास्त दुध देणाऱ्या म्हशींमध्ये या आजाराचे जास्त प्रमाण आढळून येते. दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये स्फुरद खनिजाची गरज तुलनेने जास्त असते आणि त्या प्रमाणात आहारातून पुरवठा न झाल्यास म्हशी या आजारास बळी पडू शकतात.

हेही पाहा-  म्हशीमध्ये स्फुरद कमतरतेमुळे होणारा लाल मूत्र आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

 हा आजार म्हशींमध्ये झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात- 

  • लाल, काळसर किंवा कॉफीच्या रंगाची लघवी होते.
  • शेण टाकताना कुंथुन टाकतात.
  • खाणेपिणे मंदावते, वजन घटते, अशक्तपणा वाढून जनावर मलूल बनते.
  • दूध उत्पादन घटते.
  • शरीराचे तापमान जरी सर्वसाधारण असले तरीही नाडीचा आणि श्वसनाचा वेग वाढतो.
  • तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होतो.
  • डोळ्यातील श्लेम पटल पांढरे किंवा कावीळ झाल्यास पिवळसर पडतात.
  • बाधित म्हशींचा उपचार केला नाही तर तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होवून ४-५ दिवसात बाधित म्हशी दगावण्याची शक्यता असते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

    Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

    SCROLL FOR NEXT