It is a crime to keep banned fish 
कृषी पूरक

माशांच्या शेतीत पाण्याची प्रत राखा!

मस्त्यशेतीचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी पाण्याची प्रत माशांच्या वाढीवर परिणाम करते. माशांच्या वाढीसाठी पाण्याचे विविध गुणधर्म महत्त्वाचे असतात.

Roshani Gole

मस्त्यशेतीचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी पाण्याची प्रत फार महत्त्वाची असते. पाण्याच्या गुणवत्तेवर माशांची वाढ अवलंबून असते. मस्त्यशेतीकरता वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक आणि स्वच्छ असावे लागते. पाण्यातील एकूण क्षार घटकांच्या प्रमाणानुसार मस्त्यशेतीचे एकूण तीन प्रकार येतात. यात,

- गोड्या पाण्यातील मस्त्यशेतीमध्ये क्षारांचे प्रमाण ०.१ ते ०.५ असते.

- निमखाऱ्या पाण्यातील मस्त्यशेतीमध्ये क्षारांचे प्रमाण ०.५ ते ३५ असते.

- तर खाऱ्या पाण्यातील मस्त्यशेतीमध्ये क्षारांचे प्रमाण हे ३५ च्या वर असते.

गोड्या पाण्यात प्रामुख्याने भारतीय कार्प, चायनिज कार्प, तिलापिया, पंगस, देशी मागूर आणि कोळंबीचे संवर्धन केले जाते.

- माशांच्या योग्य वाढीसाठी पाण्याचे गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण पाण्याच्या गुणवत्तेवर माशांची वाढ अवलंबून असते.

- सर्वसाधारणपणे या तलावाची पाण्यानी व्यापलेली खोली १ ते १.५ मीटर असावी. खोली याहून जास्त असल्यास पाण्याचे व्यवस्थापन करताना अडचण निर्माण होते.

- पाण्यातील मूलभूत घटक, जसे कि सामू, क्षारांचे प्रमाण, पाण्याचे गुरुत्व, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन आणि इतर नायट्रोजन पदार्थ इत्यादीचे पाण्यामध्ये योग्य प्रमाण असावे लागते.

- पाण्यातील घटक गुणधर्म सभोवतील पार्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळाची माती, पाण्यातील सूक्ष्म जीव इत्यादींवर अवलंबून असतात. पाण्याचे योग्य गुणधर्म टिकवून ठेवण्याकरिता सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन असावे लागते.

- तलावातील पाणी वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी इनलेट दरवाजा व आउटलेट दरवाजाचा वापरावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT