Deworming Agrowon
कृषी पूरक

Deworming : जंतनाशक प्रभावी का ठरत नाहीत?

तज्ज्ञांचा सल्ला न घेता जंतनाशकांची मात्रा कमी जास्त प्रमाणात दिल्यामुळ ठरावीक जंतनाशकांचे योग्य परिणाम मिळत नाहीत.

Team Agrowon

पशुपालक जनावरांना नियमितपणे सर्व वयोगटातील गायी, म्हशी, वासरे, कालवडी आणि शेळ्या-मेढ्यांमध्ये डीवर्मिंग (Deworming) करतात.

तज्ज्ञांचा सल्ला न घेता जंतनाशकांची मात्रा कमी जास्त प्रमाणात दिल्यामुळ ठरावीक जंतनाशकांचे योग्य परिणाम मिळत नाहीत.

परिणामी, जंतांमध्ये जंतनाशकाप्रती प्रतिरोध निर्माण होतो. त्यामुळ जंतनाशकांची ठरावीक मात्रा देऊनही जंतावर कोणताही परिणाम होत नाही.

जंताच्या पुढच्या पिढीमध्ये ठराविक जंतनाशकासाठी प्रतिरोध परावर्तित होतो. त्यामुळे प्रभावी जंतनिर्मूलन शक्य होत नाही.

जनावरांमध्ये जंतनाशकाप्रती प्रतिरोध का निर्माण होतो? तसंच जंतनाशकाप्रती प्रतिरोध निर्माण झाल्यामुळ काय नुकसान होत? याविषयी परोपजीविशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथील डॉ. बाबासाहेब नरळदकर यांनी दिलेली माहिती पाहुया. 

जनावरांमध्ये जंतनाशकाप्रती प्रतिरोध का निर्माण होतो ?

जंतांच्या प्रजातीची योग्य माहिती न घेता कोणत्याही जंतनाशकाची कमी जास्त प्रमाणात मात्रा देण.

जंतनाशकाची निवड करताना पशुवैद्यक तज्ज्ञांचा सल्ला न घेण.

वारंवार एकाच जंतनाशकाचा वापर करण.

जनावरांच्या विष्टेच्या नमुन्यांची तपासणी न करता जंतनाशक औषधाची मात्रा देण.

जंतनाशकाप्रती प्रतिरोध निर्माण झाल्यामुळ काय नुकसान होत?

जंतावर योग्य औषधोपचार करण शक्य होत नाही. परिणामी, जंत रक्त आणि अन्नशोषण करतात. त्यामुळे पशुधनाची शरीर प्रकृती खालावते.

जंतनाशक प्रभावीपणे काम न केल्यामुळे पैसा आणि श्रम व्यर्थ जातात.

जंताच्या प्रादुर्भावामुळे जनावराच्या शरीरस्वास्थाचा ऱ्हास, दुग्धोत्पादन आणि वजनातील घट, पुनरुत्पादनावर परिणाम संभवतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT