For chevon purpose rear African Boer Goat  
कृषी पूरक

मांस उत्पादनासाठी बोअर शेळीपालन करा

शेळीपालन व्यवसाय मांस उत्पादनासाठी केला जात असल्यामुळे उस्मानाबादी , संगमनेरी , बोअर या जातीच्या शेळ्यांचीनिवड करावी. जुळी करडे देणाऱ्या शेळ्या पैदाशीसाठी निवडाव्यात. पैदाशीचा नर निवडताना तो जुळ्यांपैकी आहे याची खात्री करावी.

टीम अॅग्रोवन

शेळीपालन व्यवसाय मांस उत्पादनासाठी केला जात असल्यामुळे उस्मानाबादी (Osmanabadi), संगमनेरी (Sangamneri), बोअर (Boer) या जातीच्या शेळ्यांची निवड करावी. जुळी करडे देणाऱ्या शेळ्या पैदाशीसाठी निवडाव्यात. पैदाशीचा नर निवडताना तो जुळ्यांपैकी आहे याची खात्री करावी.  सतत एकच करडू देणाऱ्या शेळ्यांना कळपातून काढून टाकावे.

हेही पाहा- बोअर शेळी संगोपनाकडे वाढता कल

अफ्रिकन बोअर (African Boer) यांचा रंग पांढरा असून मानेवर तपकिरी रंग असतो. यांचे कान आखूड असतात. शिंगे मागे वळालेली आखूड असतात. कपाळ फुगीर असते. जन्मतः करडाचे वजन २ ते २.५ किलोपर्यंत असते. ६ महिन्यात यांचे वजन २५ ते ३० किलोपर्यंत जाते. प्रौढ मादीचे वजन ४० किलो भरते. प्रौढ नराचे वजन हे ७० ते ८० किलोपर्यंत जाते. मादी ७ महिने वयाची असताना पहिल्यांदा वयात येते.  प्रथम रेतनाचे वय हे ८ महिने असते. करडांच्या वाढीचा वेग दररोज १०० ते १५० ग्रॅम. हेही पाहा- शेळी पालनाचे विविध प्रकार कोणते? अनुवंशिक गुण उत्तम असूनही अनुकूल वातावरण नसेल तर अपेक्षेनुसार उत्पादनवाढ मिळत नाही. म्हणून संतुलित आहार, सुयोग्य गोठा, उत्तम संगोपन, आणि परिणामकारक रोगप्रतिबंधक उपाय याकडे लक्ष द्यावे. कमीत कमी वयात जास्तीत जास्त वजन वाढणारी करडे अधिक किफायतशीर ठरतात. हा गुण करडांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळतो. म्हणून सरासरीपेक्षा जास्त वजन वाढीचा वेग असणाऱ्या आई-वडिलांच्या करडांना पैदाशीसाठी निवडावे, यासाठी करडे आणि शेळ्यांची ठराविक कालावधीनंतर नियमितपणे वजने घ्यावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT