Milk Agrowon
कृषी पूरक

Cow Milk : सातारा जिल्ह्यात गायीच्या दुधाची आवक घटली

लम्पी स्कीन’ आजाराने गायी पशुधन बाधित होत असल्याने दूध संकलन मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात गायीच्या दुधात सुमारे दीड ते दोन लाख लिटरने घट झाली आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : ‘लम्पी स्कीन’ आजाराने (Lumpy Skin Disease) गायी पशुधन (Livestock) बाधित होत असल्याने दूध संकलन (Milk Collection) मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात गायीच्या दुधात सुमारे दीड ते दोन लाख लिटरने घट झाली आहे. हा आजार आटोक्यात न आल्यास गायीच्या दुधाचा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरात सुमारे २५ जिल्ह्यांमध्ये जनावरांना ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. गायी व बैलांना या आजाराचा अधिक प्रादुर्भाव होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजार ५२१ जनावरे बाधित आहेत. यातील दोन हजार १०० जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. तर ३५८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या आजाराला रोखण्यासाठी पशुधन पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यातील एकूण पशुधनापैकी ९९ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, या आजाराने दूध उत्पादक शेतकरी वर्ग पूर्णत: कोलमडला आहे. आर्थिक नुकसानीसह दूध व्यावसायिकही संकटात सापडला आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दर दिवशी गायीच्या दुधाचे संकलन दहा लाख ५२ हजार ७०० लिटर, तर सप्टेंबर महिन्यात १० लाख ४७ हजार १०० लिटर झाले आहे. दर दिवशी गायीच्या दुधात सुमारे पाच ते सात हजार लिटरने घट झाली आहे.

या दोन महिन्यांत सुमारे दीड ते दोन लाख लिटरने घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात म्हशीच्या दुधाचे संकलन दोन लाख ४७ हजार ६०० लिटर झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात दोन लाख ६६ हजार लिटर आले आहे. याउलट म्हशीच्या दुधात सुमारे १८ हजार ४०० लिटरने वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाटण, जावळी, वाई, सातारा या जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाने ओला चारा उपलब्ध झाल्याने म्हशीच्या दुधात वाढ झाली आहे. मात्र, जिल्ह्यात गाईला मोठ्या प्रमाणात आजाराची लागण झाल्याने दुधाची आवक घटली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

SCROLL FOR NEXT