अाले प्रक्रिया
अाले प्रक्रिया 
कृषी पूरक

अाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे, कॅंडी

कीर्ती देशमुख, डॉ. उमेश ठाकरे

आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. पाचक म्हणून याचा औषधी उपयोग होतो. त्याचबरोबरीने घरच्या घरी आल्यापासून लोणचे आणि कॅंडी बनविता येते. अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाते. आल्यामध्ये ९१ टक्के पाणी २.५ टक्के प्रोटिन, १३ टक्के कार्बोहायड्रेट असतात. आल्यापासूनच सुंठ तयार करतात. आले पाकात टाकून त्याच्या वड्या करतात. आले पाकाच्या वड्या सेवन केल्या असता उत्तम भूक लागते. अाल्याचे अाैषधी गुणधर्म

  • खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते.
  • भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे त्याने पोट साफ होते व भूकही लागते
  • अॅसिडिटीवरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडे मीठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही.
  • जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल, तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते.
  • सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते
  • आल्याचा रस कोमट पाण्यात १ चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.
  • ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.
  • आल्यामध्ये कोलेस्टेरॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठीही आलं वापरतात.
  • डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते.
  • आल्याच्या किसाचे लोणचे

  • लोणचे तयार करण्यासाठी आले कीस ५०० ग्रॅम, लिंबू रस १२५ मि.लि., मसाला पदार्थ लागतात, त्याचबरोबरीने तिखट ३० ग्रॅम, मीठ १५० ग्रॅम, हळद दहा ग्रॅम, बडीशोप २० ग्रॅम, मोहरी डाळ ७५ ग्रॅम, मेथी चार ग्रॅम, तेल ३०० मि.लि. हिंग चवीनुसार वापरावे.
  • आले स्वच्छ करून खराब, किडलेले आल्याचे गड्डे वेगळे करावेत. स्वच्छ केलेले आले किसून त्याची संपूर्ण साल काढावी. साल काढलेला आल्याचा बारीक कीस करावा.
  • बडीसोप, मेथी, मोहरी भाजून त्याची बारीक पूड तयार करावी. सर्व मसाला पदार्थ बारीक करून घ्यावेत. तेल गरम करून त्यात थोडे हिंग मिसळावे.
  • तेल थंड झाल्यानंतर बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा. त्यानंतर मसाल्याचे मिश्रण व आल्याचा कीस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा.
  • संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यावे. एकत्र केलेले मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत भरावे. काही दिवसांतच आल्याचे लोणचे तयार होईल.
  • आल्याची कॅंडी

  • कॅंडी तयार करण्यासाठी आल्याचे काप एक किलो, साखर एक किलो, सायट्रिक अॅसिड पाच ग्रॅम, पाणी हे घटक लागतात.
  • आले स्वच्छ करून त्याची साल काढून घ्यावी. नंतर त्याचे आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यावेत. काप १० ते १५ मिनिटे ब्लॅचिंग करून घ्यावेत. काप २० ते २५ मिनिटे हवेत उघड्यावर ठेवावेत.
  • काप काही प्रमाणात वाळल्यानंतर वजन करून त्याच्या वजनाइतकी साखर आणि पाच ग्रॅम सायट्रिक अॅसिड घ्यावे. त्याचा एकतारी पाक तयार करून पाकात आल्याचे काप टाकावेत.
  • हे मिश्रण २४ तास ठेवून पुन्हा त्याचा पाक हा दोनतारी करावा. असेच एकासोबत एक असे तीन वेळा करावे. काप बाहेर काढून उन्हात वाळवावे. त्याची आल्याची कॅंडी तयार होईल. आल्याच्या कापातील तिखटपणा कमी होईपर्यंत ते काप पाकात ठेवावेत.
  • संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

    Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    SCROLL FOR NEXT