दुधाळ जनावरे सशक्त राहण्यासाठी पुरेसा आहार द्यावा.
दुधाळ जनावरे सशक्त राहण्यासाठी पुरेसा आहार द्यावा. 
कृषी पूरक

जास्त दुग्धोत्पादनासाठी वाढवा अाहारातील पोषणतत्त्वे

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील

दुधाळ जनावरांमध्ये पोषणतत्त्वाच्या अभावामुळे रोग उद्‌भवतात. जनावरे वेळेत माजावर येत नाहीत. यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कमी आहारातून जनावरांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्त्वांची घनता वाढवणे आवश्‍यक आहे.

संकरित दुधाळ जनावरांचे दूध   उत्पादन हे देशी जनावरांपेक्षा जास्त असते. दूध देण्याच्या सुरवातीच्या ६ आठवड्यांमध्ये दूध तयार करण्यासाठी लागणाऱ्या पोषकतत्त्वांचे प्रमाण हे आहारातून मिळणाऱ्या पोषणतत्त्वांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. कारण या काळात जनावरांचा आहार कमी असतो. कमी आहारातून त्यांची शरीराची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. म्हणून या काळात दूध उत्पादनासाठी गायी/ म्हशींच्या शरीरात साठवलेल्या पोषणतत्त्वांचा वापर केला जातो. त्यामुळे या काळात जनावरांचे दिवसेंदिवस वजन कमी होते व जनावर अशक्त होते. त्यामुळे पुढील दूध उत्पादन कमी मिळते. 

  • दूध देण्याच्या सुरवातीच्या सहा आठवडे कालावधीमध्ये कमी आहारातून पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्त्वांची घनता वाढवणे आवश्‍यक आहे.
  • पोषणतत्त्वांची घनता वाढवण्यासाठी अाहारात द्विदल चारा पिकांचा वापर करणे, संरक्षित स्निग्ध पदार्थ, संरक्षित प्रथिने यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
  • चॅलेंज फिडिंग किंवा जास्तीचा आहार

  • गाय / म्हैस विण्याच्या अगोदर दोन आठवडे खुराकाचे प्रमाण दैनंदिन मात्रेपेक्षा वाढवणे याला चॅलेंज फिडिंग असे म्हणतात.
  • दैनंदिन मात्रेपेक्षा सुरुवातीला ५०० ग्रॅम प्रतिदिन याप्रमाणे खुराकाच्या प्रमाणात वाढ करावी नंतर प्रतिदिन ५०० ते १००० ग्रॅम प्रति १०० किलो वजनास याप्रमाणे खुराकाचे प्रमाण ठेवावे. 
  • जास्त खुराकाच्या प्रमाणामुळे दूध उत्पादनात जास्तीत जास्त वाढ होते. तसेच ज्या जनावरांची पचनक्षमता जास्तीत जास्त पोषणतत्वांच्या पचनासाठी तयार होते यामुळे प्रतिवेत दूध उत्पादनात वाढ होते.
  •  दुधाळ जनावरांना त्यांच्या वजनाप्रमाणे दूध देण्याचे प्रमाण व दुधातील स्निग्धांश (फॅट)चे प्रमाण यानुसार आहारामध्ये हिरवा 
  • चारा (एकदल आणि द्विदल), वाळला चारा व खुराकाचा वापर करावा.
  • दुधाळ जनावरांसाठी खुराक

    घटक खुराक-१ खुराक-२  
    मका भरडलेला ३३ ५०
    शेंगदाणा पेंड २० ---
    मोहरी पेंड १० ----
    सरकी पेंड ०३ ३०
    गहू भुसा १५ ---
    उडीद चुरी --- १७
    राईस पॉलिश १० ----
    तेलविरहित राईस पॉलिश ०६ ---
    क्षार मिश्रण   ०२ ०२
    मीठ ०१ ०१

    संपर्क -  डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT