Proper care should be taken while treating sick animals 
कृषी पूरक

पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या काळजी

जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा पशुपालक यांनी मास्क वापरावेत. हात साबण किंवा हँड वॉशने स्वच्छ धुवून घ्यावेत. पशुवैद्यकांनी दवाखान्यात जाताना मास्क, हातमोजे, गॉगल, टोपी व ॲप्रन परिधान करावा. पशू आणि मानवी आरोग्याच्यादृष्टीने काळजी घ्यावी.

डॉ. रविंद्र जाधव, डॉ.अनिल भिकाने

जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा पशुपालक यांनी मास्क वापरावेत. हात साबण किंवा हँड वॉशने स्वच्छ धुवून घ्यावेत. पशुवैद्यकांनी दवाखान्यात जाताना मास्क, हातमोजे, गॉगल, टोपी व ॲप्रन परिधान करावा. पशू आणि मानवी आरोग्याच्यादृष्टीने काळजी घ्यावी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेबरोबरच इतर सर्वच क्षेत्रांवर परिणाम दिसून येत आहे. पशूद्वारे कोरोना आजाराचे माणसामध्ये संक्रमण होत नाही. तरीही सध्याच्या काळात पशुपालन आणि दुग्धव्यवसाय व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

  • जनावरांच्या गोठ्यात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करावी.
  • जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा पशुपालक यांनी मास्क वापरावेत. हात साबण किंवा हँड वॉशने स्वच्छ धुवून घ्यावेत. वेळोवेळी हॅंड सॅनीटायझर वापरावे.
  • गोठ्यात असणारी उपकरणे व दुधाची भांडी नियमित स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यावीत. त्यानंतर उपयोगात आणावीत.
  • गोठ्यात दिवसभर काम करत असताना ज्या ठिकाणी मजूर किंवा पशुपालकांचा जास्तीत जास्त संपर्क येतो अशी ठिकाणे दररोज सोडियम हायपोक्लोराईड (१%) किंवा स्पिरीट (७०%) यांनी दिवसाच्या शेवटी निर्जंतुक करून घ्यावीत.
  • बाजारातून जनावरांची खरेदी शक्यतो टाळावी. जेणेकरून संसर्ग टाळण्यास मदत होईल. खरेदी आवश्यक असेल तर ती स्थानिक स्तरावर पशुपालकाकडून किंवा ई-मार्केटिंगद्वारे करावी. खरेदी केलेले जनावर हे किमान ३ आठवडे गोठ्यामध्ये वेगळ्या ठिकाणी ठेवावे.
  • आवश्यक पशुवैद्यकीय सेवा (कृत्रिम रेतन, अवघड प्रसूती) या शक्यतो पशू तज्ज्ञांमार्फत गोठ्यातच करून घ्याव्यात.
  • स्वच्छतेबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व जनावरांना योग्य निवारा व सावली उपलब्ध करावी. उष्णतेचा ताण कमी करावा.
  • पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध असल्यास दिवसातून किमान एक वेळा जनावरांना थंड पाण्याने धुवून घ्यावे. जनावरांना दिवसभर पिण्यासाठी मुबलक थंड व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • दूध विक्रेत्यांनी घ्यावयाची काळजी

  • स्वच्छता पाळण्यासाठी मास्क नियमित पूर्णवेळ वापरावेत. हँड सॅनीटायझरचा वेळोवेळी वापर करावा.
  • दूध विक्री दरम्यान ग्राहकापासून किमान ३ फुटाचे सुरक्षित अंतर ठेवून विक्री करावी.
  • दूध विक्री करताना वापरण्यात आलेले वाहन विक्री पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यावे.
  • विक्रेत्यांनी घरी आल्यानंतर अंघोळ करावी. कपडे धुवून निर्जंतुक करावेत.
  • विक्री दरम्यान घरोघरी पैशांद्वारे संपर्क टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करावेत.
  • विक्री करताना विक्रेता व ग्राहक यांच्यामध्ये कमीत कमी संपर्क प्रस्थापित होईल अशा पद्धतीने उपाययोजनांचा अवलंब करावा.
  • सेल काउंटरवर दुधाची विक्री करताना ग्लोव्हज आणि मास्कचा वापर आवश्यक करावा. ग्राहकांना किमान ३ फूट अंतराचे निर्बंध घालावेत.
  • श्वान पालकांनी घ्यावयाची काळजी

  • श्वानास सकाळी बाहेर फिरावयास नेऊ नये. अंगणात व्यायाम द्यावा.
  • श्वानांना स्वच्छ-मुबलक पाणी व संतुलित आहार द्यावा. त्यांची खाण्या-पिण्याची भांडी स्वच्छ ठेवावी.
  • घरातील एखाद्या सदस्यास खोकला किंवा सर्दी असेल तर अशा व्यक्तींनी श्वानापासून दूर राहावे.
  • श्वानांना उष्टे अन्न देऊ नका.ज्या वस्तूंमुळे श्वानांना संसर्ग होऊ शकतो अशा वस्तूंपासून दूर ठेवावे.
  • श्वानांना हात लावण्यापूर्वी व लावल्यानंतर हात साबणाने धुऊन स्वच्छ करावेत.
  • घरात श्वान-मांजर ज्या ठिकाणी ठेवतो, ते ठिकाण १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईड द्रावणाने साफ करून घ्यावे.
  • पशुवैद्यकांनी घ्यावयाची काळजी 

  • दवाखान्यात जाताना मास्क, हातमोजे, गॉगल, टोपी व ॲप्रन/ गाऊन परिधान करून बाहेर पडावे.
  • पशुवैद्यकीय दवाखान्यात दर्शनी भागात साबण, पाणी आणि हॅन्ड सॅनीटायझर उपलब्ध असावा.
  • दवाखान्यात दैनंदिन कामकाज सुरु करण्यापूर्वी आपले हात साबण किंवा हँड वॉशचा वापर करून किमान २० सेकंद घासून धुवून स्वच्छ करावेत. त्यानंतर हातमोजे घालावेत.
  • हातमोजे घातल्यानंतर हाताचा स्पर्श कान, डोळे, नाक व चेहऱ्यावरील इतर ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • किमान ६० टक्के अल्कोहोलमिश्रित ७ मिली सॅनीटायझर दोन्ही हातावर घेऊन, हात दोन्ही बाजूने निर्जंतुक करून घ्यावेत.
  • कार्यालय, दवाखान्यातील कामकाजाचे ठिकाण आणि तेथील नेहमी हाताचा संपर्क येणाऱ्या वस्तू (विजेचे बटण, दरवाजा हँडल, पाण्याचे नळ) दर तीन तासाला १टक्के सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने फवारून निर्जंतुक करावेत.
  • पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करत असताना दोन व्यक्तीमधील अंतर किमान १ मीटर राहील याची काळजी घ्या.
  • कामकाजादरम्यान भ्रमणध्वनीचा वापर अनिवार्य असल्यास शक्यतो स्पीकरवर बोलावे. जेणेकरून फोनचा चेहऱ्याशी संपर्क होणार नाही.
  • पशुवैद्यकीय दवाखान्यातून घरी गेल्यावर सर्वात प्रथम साबण व स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी. कपडे तात्काळ धुवून निर्जंतुक करून घ्यावेत.
  • अपरिहार्य परिस्थितीत जास्त लोकांना एका ठिकाणी काम करावयाची आवश्यकता पडल्यास छोटे समूह करून त्यांच्यामध्ये १ मीटर अंतर ठेवून योग्य उपाययोजना कराव्यात.
  • संपर्क- डॉ.अनिल भिकाने, ९४२०२१४४५३ (चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

    Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

    Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

    E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

    Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

    SCROLL FOR NEXT