अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. मशरूम ...सर्व जगभर नावलौकिक असलेली आरोग्यदायी बुरशी. आपल्याकडे यास अळिंबी म्हणतात. गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये अळिंबी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारने अलीकडे शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्य भोजनामध्ये अळिंबीचा सामावेश केला. त्यामुळे अळिंबीची मागणी वाढणार आहे. शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला बचत गटांना अळिंबी उत्पादनातून आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी आहे. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे. भारतामध्ये गरजेच्या तुलनेने अळिंबीचे उत्पादन फारच कमी आहे. सध्या लोकांमध्ये आजारांविषयी तसेच अळिंबीच्या औषधी गुणधर्मांविषयी बरीच जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजारांना दूर ठेवण्यासाठी अळिंबी व त्यापासून तयार केलेले पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अजूनही या क्षेत्रात फारशी स्पर्धा नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कमी भांडवली व्यवसाय. घरातील कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय सुरू करू शकते. एकदा प्रशिक्षण घेतल्यावर तज्ज्ञ माणसाची गरज भासत नाही. अळिंबीचे उत्पादन म्हणजे प्रदूषणविरहित व्यवसाय. माल विकला नाही तर दुय्यम पदार्थ करून विक्री करता येते. शेतातील टाकाऊ पदार्थ हेच भांडवल आहे. स्वतः: बरोबरच इतरांसाठी सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र आहे.अळिंबी लागवडीसाठी बँका, केंद्र तसेच राज्य शासनाकडूनही अनुदान प्राप्त होते. त्यामुळे व्यावसायिक किंवा पारंपरिक शेती करणारे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कृषी तसेच इतर पदवीधरांना यामध्ये संधी आहे. ओळख अळिंबीची
काही समज- गैरसमज
आहारासाठी फायदेशीर व्यावसायिक उत्पादकांनी पिकवलेली अळिंबी ही बाजारपेठेत उपलब्ध असते. ही अळिंबी खाण्यायोग्य असते, त्यामुळे अशी अळिंबी ग्राहकाने आवर्जून खरेदी करून तिचा आहारात वापर करावा. काही आदिवासी त्यांच्या अनुभवावरून खाण्यायोग्य अळिंबी शोधून खातात. त्याची विक्रीही करतात. काही भूछत्रे भूमिगत असल्यामुळे प्रशिक्षित कुत्र्याच्या मदतीने अशी भूछत्रे शोधून काढतात. जगभरात अळिंबीच्या वीस हजारांपेक्षा जास्त जाती आहेत. अळिंबीची प्रामुख्याने चीन, इटली, अमेरिका, नेदरलॅंड, पोलंड, स्पेन, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, कोरिया, भारत इत्यादी देशात लागवड केली जाते. सर्वांत जास्त अळिंबी चीनमध्ये खाल्ली जाते. व्यावसायिक संधी
आरोग्यदायी फायदे
संपर्क ः डॉ.अनिल गायकवाड,९४२०४९८८११ (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.