पशु सल्ला
पशु सल्ला  
कृषी पूरक

पशु सल्ला

अजय गवळी, डॉ. विशाल केदारी

खरेदी केलेल्या जनावराची प्रदर्शनासाठी किंवा इतर काही कारणास्तव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करावी लागते. वाहतुकीमुळे जनावरांवर ताण येतो. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. वाहतुकीचे अंतर कमी जास्त प्रमाणात असू शकते. कमी अंतर असल्यास टेंपो किंवा ट्रकने वाहतूक करता येते. जास्त किंवा दूरवर वाहतूक करायची असेल तर त्यासाठी रेल्वेचा वापर केल्यास जनावरांना ते अारामदायक ठरते.    

जनावराची वाहतूक करताना घ्यावयाची काळजी

  • जनावराची वाहतूक शक्यतो सकाळच्या वेळेस करावी. जेणेकरून तापमानाचा परिणाम होणार नाही.
  • जनावरे वाहतूक करण्याआधी ट्रक किंवा टेंपो दोन तास अगोदर अातून जंतुनाशकाने स्वच्छ करावा.
  • गाडीमध्ये गवताचा बेड तयार करावा. किंवा ट्रकच्या आजूबाजूला अातल्या भागाला गवताच्या पेंढ्याने भरलेल्या गोण्या बांधाव्यात जेणेकरून जनावरांना कोणत्याही प्रकारचे हादरे बसणार नाहीत. परिणामी जनावरांना जखमा होणार नाहीत.
  • ट्रकमध्ये जनावरे बांधताना समान अंतरावर बांधावीत.
  • पाच ते सहापेक्षा जास्त जनावरे एका ट्रकमधून नेऊ नयेत. ट्रकमध्ये प्रवासादरम्यान काळजी घेण्यासाठी एक माणूस असावा.
  • जनावरांना गाडीत घालण्यापूर्वी एक तास अगोदर पाणी पाजावे.
  • वाहतुकीदरम्यान जनावरांना हिरवा चारा देऊ नये.  
  • ट्रक किंवा टेंपोचा ताशी वेग ३० ते ३५ कि.मी.पेक्षा जास्त असू नये.
  • गाडीतून उतरविल्यानंतर जनावरांना कमीत कमी अर्धा तास तरी पाणी देऊ नये.
  • विशेषतः जनावर गाभण असल्यास विशेष काळजी घ्यावी.
  • प्रवास विमा काढून घ्यावा.
  • अधिकृत असलेल्या कंपनीमार्फतच वाहतूक करावी.
  • जिल्ह्याच्या बाहेर जनावरे पाठवायची असल्यास लसीकरणाच्या नोंदी किंवा पशुवैद्यकाने दिलेले प्रमाणपत्र जवळ ठेवावे.
  • संपर्क : अजय गवळी,  ८००७४४१७०२ (पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

    Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

    Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

    Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

    Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

    SCROLL FOR NEXT