Bindii plants
Bindii plants 
कृषी पूरक

जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर

मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु पशुपालक याकडे सुरुवातीस दुर्लक्ष करतात. पर्यायाने याची तीव्रता वाढते. या आजारावर वनस्पतिजन्य औषधाने उपचार शक्य आहे.  शरीरातील अपायकारक, अनावश्यक घटक रक्तातून बाहेर काढणे आणि ते मूत्राद्वारे विसर्जित करणे हे मूत्रसंस्थेचे कार्य. विसर्जन करण्याच्या क्रियेत अडथळा झाल्यास त्याचा गंभीर परिणाम होतो. हा अडथळा म्हणजेच मूतखडा. हा आजार जनावरांमध्ये देखील आढळतो. पशुखाद्यामध्ये जास्त प्रमाणात असलेल्या ऑक्झलेट, इस्ट्रोजन, सिलिकामुळे हा आजार संभवतो. याशिवाय पिण्याच्या  पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार हेदेखील आजारास कारणीभूत ठरतात.  मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु पशुपालक याकडे सुरुवातीस दुर्लक्ष करतात किंवा हा आजार त्यांच्या लक्षात येत नाही. पर्यायाने आजाराची तीव्रता वाढते. जनावरे योग्य प्रमाणात मूत्रविसर्जन करत नाहीत. शेवटी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत  नाही. उपयुक्त औषधी वनस्पती  गोखरू  सराटे अशा नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे फळ म्हणजे सराटे औषधीमध्ये वापरतात. याचा वापर करत असताना सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत. कारण हे काटे अन्ननलिका किंवा पोटामध्ये इजा करू शकतात. हाडवणी  मूतखडा या आजारावर उपयुक्त असलेली ही वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये जिवाणूविरोधी देखील गुण आहेत. वनस्पतीची साल औषधात वापरतात. सालीचे चूर्ण किंवा रस उपचारासाठी वापरतात. पाषाणभेद  सर्वत्र आढळणारी ही वनस्पती नावाप्रमाणेच पाषाण म्हणजेच मूतखडा भेदण्यासाठी उपयुक्त आहे. कुलशी  महाराष्ट्र, आंध्र प्रदेश  व दक्षिण भारतात सर्वत्र आढळणारी ही वनस्पती. या वनस्पतीचे बी औषधीमध्ये वापरतात. सेगमकटी  विशेषतः दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती मूत्रसंस्थेच्या बहुतांशी आजारांमध्ये उपयुक्त आहे. या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात. गोरख गांजा  सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण किंवा रस औषधीमध्ये वापरतात. (टीप :  वरील सर्व वनस्पती एकत्र करून बारीक करून घ्याव्यात. जनावरांच्या खाद्यातून किंवा पाण्यातून पाजाव्यात.) - डॉ. सुधीर राजूरकर,    ९४२२१७५७९३ (प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय,  परभणी)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT