World Donkey Day Agrowon
काळजी पशुधनाची

World Donkey Day : सकस आहार देऊन गाढवांप्रती व्यक्त केली कृतज्ञता; पालकांना मार्गदर्शन

Donkey Farming : गाढवांबद्दलच्या चांगल्या माहितीचा प्रचार करणे, त्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे सांगणे हा जागतिक गाढव दिनाचा उद्देश आहे.

Team Agrowon

Nanded News : अत्यंत कष्टाळू परंतु दुर्लक्षित अशा गाढवांप्रती कृतज्ञता व्यक्त करून या प्राण्याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवारी (ता. ८) जागतिक स्तरावर जागतिक गाढव दिन म्हणून साजरा केला जातो. सगरोळी (ता. बिलोली) येथील धर्मा डॉंकी सँचुअरी या संस्थेतर्फे आरळी (ता.बिलोली) येथील गाढव व त्यांच्या पालकांसोबत दिवस साजरा केला.

गाढवांबद्दलच्या चांगल्या माहितीचा प्रचार करणे, त्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे सांगणे हा जागतिक गाढव दिनाचा उद्देश आहे. हा दिवस या प्राण्याची जबाबदारीने काळजी व देखभाल करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देखील समर्पित असल्याने हा दिवस आरळी येथे साजरा करण्यात आला.

आरळी येथे शंभरहून अधिक गाढवांची संख्या आहे. कृषी निविष्ठा, बांधकाम साहित्य व वाळू वाहतुकीसाठी या गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यावेळी येथील पशुपालकांना गाढवांची निगा, आरोग्याची काळजी व उष्माघातापासून पशूंचे संरक्षण कसे करावे याविषयी धर्मा डॉंकी सँचुअरीचे स्वयंसेवक तथा कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ पशुवैद्यक डॉ. निहाल मुल्ला यांनी माहिती दिली.

यावेळी गाढवांना सकस आहार पुरविण्यात आला. कार्यक्रमात पशुपालक उपस्थित होते. जागतिक गाढव दिन प्रथम २०१८ मध्ये अर्क रझीक या वाळवंटी प्राणी शास्त्रज्ञाने सुचवला होता. त्यांना जाणवले की, गाढवाने मानवी समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्याचा पुरेसा सन्मान होत नाही. सन २०१९ पासून अधिकृतपणे हा दिवस साजरा केला जातो.

सगरोळी (ता.बिलोली) येथील धर्मा डॉँकी सँच्यूअरी ही संस्था गत २५ वर्षांपासून गाढवांच्या आरोग्याची काळजी व पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहे. वर्षांपासून फियापो व इंडिया ऍनिमल फाउंडेशनच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई परिसरातील वीट भट्‌ट्यांवर काम करणाऱ्या तर सगरोळी परिसरात कृषी निविष्ठा, बांधकाम साहित्य व रेती वाहतूक करणाऱ्या दोन हजाराहून अधिक गाढवांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. जागतिक गाढव दिन या कार्यक्रमात धर्मा डॉँकी सँच्यूअरीचे विश्वस्त अभिजित महाजन, स्वयंसेवक सचिन येरमाळकर, भास्कर बुच्छलवार, ज्ञानेश्वर जाधव पशुपालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT