Calf Care 
काळजी पशुधनाची

Calf Care : वासरांची वाढ का खुंटते?

Team Agrowon

भविष्यात उत्पादक व सशक्त गाय, म्हैस संगोपन करून किफायतशीर दुग्ध व्यवसाय (Dairy Business) करायचा असेल निश्‍चितपणे वासरांच्या उत्तम संगोपनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

वासराची शारीरिक वाढ योग्य वयात झाल्यास त्यापासून उत्पादन काळ जास्त मिळतो, वासरांची संख्या जास्त मिळते, शारीरिक वाढ उत्तम झाल्यामुळे मुबलक दूध उत्पादनही मिळते.

त्याचबरोबर अशा जनावरांपासून भविष्यातही सशक्त वासरे मिळतात. मात्र बहुतांशी गोठ्यातील वासरांची वाढ खुंटलेली दिसते.         

वासरांची वाढ खुंटण्याची नेमकी कारणे काय आहेत याविषय़ी पशुतज्ज्ञ डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.     

गाभणकाळातील अपुऱ्या / निकृष्ट आहारामुळे गर्भाशयातील वासरू अशक्त राहते. अशी जन्मलेली वासरे पुढेही जलदगतीने वाढत नाहीत.       

वासरांना गरजेनुसार चीक व दूध न पाजल्यास वाढ खुंटते. वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक यांचा वापर न केल्यामुळे वासराची वाढ खुंटते. आपल्याकडील बहुतांशी पशुपालकांकडे निकृष्ट चारा उपलब्ध असतो आणि केवळ अशा चाऱ्यावर वासरांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. 

वासरांच्या जलद वाढीसाठी प्रथिनयुक्त आहाराची गरज असते. वासरांच्या शरीरातील जंत वासराचे रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात, अवयवांमध्ये बाधा निर्माण करतात. आतड्यांना इजा करतात त्यामुळे पचवलेले अन्नसुद्धा वासरांच्या शरीरात नीट शोषले जात नाही, परिणामी त्यांची वाढ खुंटते.       

गोचिड, पिसवा, उवा यासारखे बाह्यपरोपजीवी वासराचे रक्त पिऊन वाढतात. तसेच यांच्या दंशामुळे वासरू नेहमी बेचैन राहते. त्यामुळे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.       

वासरांना मोठ्या वासरांसोबत म्हणजेच गाई, म्हशींसोबत ठेवल्यामुळे  वासरे गाई/ म्हशी लहान वासरांना चारा, खाद्य  खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.

वासरांना एकेठिकाणी दोरीने बांधल्यामुळे या वासरांच्या शरीरावर एक प्रकारचा सतत ताण येतो. शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे पचनक्षमता कमी होऊन वाढ खुंटते.

गोठ्यामध्ये सभोवतालची दलदल, अस्वच्छ वातावरण  असल्यास वासराला नेहमी श्‍वसनाचे आजार होतात, हगवण लागते. त्यामुळे वासरांची वाढ खुंटते.

वासरे चांगल्याप्रकारे चारा खाऊ लागल्यानंतर, चारा पचवण्यासाठी वासरांनी मुबलक पाणी पिणे गरजेचे असते. जवळ जवळ १ किलो चारा पचवण्यासाठी ४ ते ५ लिटर पाण्याची गरज असते. परंतु वासराच्या वाढत्या पाण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष केल्यास वासरांची वाढ खुंटते.       

वासराच्या  वाढत्या शरीराची पोषणतत्त्वाची गरज दिवसेंदिवस वाढत असते. त्यानुसार वासरांच्या आहारात योग्य बदल होणे गरजेचे असते, जसे की एकदलीय व द्विदलीय चारा पिकांचा ५० टक्के वापर न करणे, योग्य प्रमाणात पशुखाद्याचा वापर न केल्यामुळे बहुतांशी वासरांच्या आहारात वाढीनुसार बदल होत नाहीत म्हणून वासरांची वाढ खुंटते.

कातडी, पोट, आतड्याचे आजार यामध्ये वासरांचे कुपोषण होऊन वासरांची वाढ खुंटते. गोठ्यातील अपुरी जागा     वासरांना खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, बसण्यासाठी, फिरण्यासाठी योग्य प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही. याचा परिणाम होऊन वासरांची वाढ खुंटते.       

वासराच्या शारीरिक वाढीसाठी खनिजसत्त्व महत्त्वाची असतात. पचनक्रिया सुरळीत राहणे व पचलेले अन्न शोषण्यासाठी क्षारांची गरज असते. 

वासरांच्या आहारात क्षाराचा अभाव झाल्यास वाढ खुंटते. काही वासरांची वाढ ही आनुवंशिकतेने कमी असू शकते. परंतु असे प्रमाण खूप कमी असते. म्हणून वासरांची चांगली वाढ होण्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेच आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT