Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : परजिल्ह्यातील जनावरांना लसीकरण केले सक्तीचे

Animal Care : लम्पी आजाराच्या पार्श्‍वभूमीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने परजिल्ह्यातील जनावरांना जिल्ह्यात आणताना लसीकरण सक्तीचे केले आहे.

Team Agrowon

Satara News : येत्या काही दिवसांत सहकारी साखर कारखान्यांचा ऊसतोड हंगाम सुरू होणार आहे. लम्पी आजाराच्या पार्श्‍वभूमीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने परजिल्ह्यातील जनावरांना जिल्ह्यात आणताना लसीकरण सक्तीचे केले आहे. लसीकरण न करता व बाधित जनावरे आढळल्यास त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपचार केले जाणार आहेत.

ऑगस्ट २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात लम्पी आजाराने जळगाव जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू राज्यभरात या आजाराचा फैलाव वाढत जाऊन जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना राबवीत लम्पी आजाराला आटोक्यात आणले होते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून लम्पीचा फैलाव वाढला आहे.

त्यातच आता ऊसतोडणीचा हंगाम सुरू होणार असल्याने परजिल्ह्यातून ऊसतोड कामगारांच्या बैलजोड्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत. या बैलांमुळे लम्पी आजार फैलावण्याचा धोका अधिक असल्याने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

पशुसंवर्धन विभाग कारखान्यांच्या हद्दीत जाऊन बैलांची तपासणी करणार आहे. परजिल्ह्यातील गोवर्धनीय जनावरांना लसीकरण सक्तीचे केले आहे. तशा सूचना कारखान्यांनाही दिल्या पाहिजेत, जेणेकरून लम्पीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे.

कारखानास्थळावर तपासणी मोहीम  

जनावरांचा लम्पी आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. १५ नोव्हेंबरपासून ऊसतोड हंगाम सुरू होणार असून, ऊसवाहतूक करणाऱ्या बैलजोड्यांची तपासणी सुरू केली आहे.

याचबरोबर कारखानास्थळावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांची तपासणी मोहीम राबविणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT