Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : वाशीम जिल्ह्यात ९१ हजार पशुधनांचे लसीकरण

वाशीम ः जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत आतापर्यंत १२६ गुरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाली असून, हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून उपायोजना करण्यात येत आहेत.

टीम ॲग्रोवन

वाशीम ः जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत आतापर्यंत १२६ गुरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा (Lumpy Skin Infection Washim) झाली असून, हा प्रादुर्भाव नियंत्रणात (Lumpy Skin Control) आणण्यासाठी शासनाकडून उपायोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१,२०७ जनावरांचे लसीकरण (Lumpy Skin Vaccination) करण्यात आले आहे. ५१ जनावरे औषधोपचारामुळे बरी झाली आहेत.

जिल्ह्यात ग्रामपंचायती स्वनिधीतून गुरांचे लसीकरण करीत असून, जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ८२८, तर पशुसंवर्धन विभागाने २६ हजार ३७९ गुरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी दिली.

‘लम्पी’मुळे जिल्ह्यातील २४ गावांतील १२६ जनावरे बाधित असल्याचे आढळून आल्याने या गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ११९ गावांतील २८ हजार २०७ गुरांचे लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत पाच गुरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला. या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बैठक घेऊन तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन आजपर्यंत ९१ हजारांपेक्षा जास्त गुरांचे लसीकरण करण्यात आले. गुरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यासाठी ५३ हजार ९३५ लस उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील गुरे लम्पी स्कीनने बाधित होऊ नये यासाठी पशुसंवर्धन आणि ग्रामपंचायत यंत्रणा काम करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT