Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : जिल्ह्यात ६१ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण

जि. प. सीईओ आशिमा मित्तल यांच्याकडून पाहणी

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये लम्पी स्कीन (Lumpy Skin)आजाराने बाधित जनावरे आढळल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाने मोठ्या प्रमाणावर लसीकरणास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ८ लाख ९५ हजार ५० जनावरे असून

यापैकी ५ लाख ५१ हजार ९८० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. जिल्ह्यात ६१ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे भेट देऊन लसीकरण मोहिमेची पाहणी केली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून लसीकरण मोहीम कशी सुरू आहे,

याबद्दल विचारणा केली. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, गिरणारे पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. भगवान पाटील, पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. किरण आठरे,

डॉ. वैभव शिंदे, डॉ. आनंदा कुटे, डॉ. सुनील संत, डॉ. युवराज वाणी, डॉ. राजेंद्र बोरसे, विस्तार अधिकारी पंचायत श्री. सोनवणे, श्रीधर सानप, देवा खोरटे, रवींद्र थेटे, प्रकाश वाघ, रमेश सोनवणे आदी कर्मचारी व उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT