Illegal Fishing Agrowon
काळजी पशुधनाची

Illegal Fishing : अनधिकृत मासेमारी करणारी रत्नागिरीतील नौका ताब्‍यात

एलईडीचा वापर करून अनधिकृतपणे मासेमारी करणारी रत्नागिरी येथील मच्छीमार नौका विजयदुर्ग समुद्रात मत्स्य विभागाने ताब्यात घेतली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : एलईडीचा वापर करून अनधिकृतपणे मासेमारी (Illegal Fishing) करणारी रत्नागिरी येथील मच्छीमार नौका (Fishing Boat) विजयदुर्ग समुद्रात मत्स्य विभागाने ताब्यात घेतली. या नौकेवर कारवाईसाठी सहाय्यक मत्स्यआयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (ता. १८) करण्यात आली.

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृपणे मासेमारी केली जाते. पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडीद्वारे मासेमारी अशा अनधिकृत पद्धतींचा मासेमारीसाठी वापर होतो. शासनाने या पद्धतींना बंदी घातलेली आहे. यासंदर्भात पांरपरिक मच्छीमारांकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, रविवारी (ता. १८) विजयदुर्ग समुद्रात मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील नौकेला मत्स्य विभागाच्या शितल नौकेच्या सहाय्याने ताब्यात घेण्यात आले. या नौकेत एलईडी लाईटस, बॅटरी, जनरेटर आदी साहित्य आढळून आले. मत्स्य विभागाने नौकेच्या मालकाला जप्तीची नोटीस दिली आहे. याशिवाय नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी सहायक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

SCROLL FOR NEXT