Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : अमरावतीत दोन हजारे जनावरे प्रादुर्भावमुक्त

लम्पी स्कीन आजाराच्या विळख्यातून जिल्ह्यातील दोन हजारांवर जनावरे मुक्त झाली असून आजारी असलेली बहुतांश जनावरे उपचाराला प्रतिसाद देत आहेत.

टीम ॲग्रोवन

अमरावती : लम्पी स्कीन आजाराच्या(Lumpy Skin Disease) विळख्यातून जिल्ह्यातील दोन हजारांवर जनावरे मुक्त झाली असून आजारी असलेली बहुतांश जनावरे उपचाराला (Lumpy Vaccination) प्रतिसाद देत आहेत. अनेक पशुपालकांकडून होणारी हेळसांड पशुसंवर्धन (Department of Animal Husbandry) विभागाची डोकेदुखी बनली आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात दररोज २० ते २२ हजार जनावरांचे लसीकरण केले जात आहे. चिखलदरा, धारणी तसेच अचलपूर या तीन तालुक्यांत लम्पी स्कीनचा फैलाव झाल्याने प्रशासनसुद्धा चिंतेत सापडले.

पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चार हजार १६९ जनावरे लम्पी स्कीनने पीडित झाली होती. त्यापैकी २ हजार ८० जनावरे लम्पी स्कीन आजारातून मुक्त झाली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार आतापर्यंत ९ पशुपालकांच्या खात्यांमध्ये मदतीचे धनादेश जमा करण्यात आले आहे. दुधाळ जनावर मृत्युमुखी पडल्यास पशुपालकाला ३० हजार, बैलासाठी २५ हजार

तर वासरू किंवा लहान पशुसाठी १६ हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. १४ तालुक्यांत १६८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहेत.जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक जनावरे लम्पी स्कीनने मुक्त झाली

असून उर्वरित जनावरे उपचाराला प्रतिसाद देताहेत. आतापर्यंत ३ लाख २५ हजार ८४० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून या आठवड्यात ७० हजार लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

- डॉ. पुरुषोत्तम सोळंके,

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT