Lumpy skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin: तीन लाख जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

जिल्ह्यातील ५५२ गावांतील ३ लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४७८ जनावरे प्रादुर्भावग्रस्त आहेत. त्यापैकी २१७ जनावरे बरी झाली आहेत.

टीम ॲग्रोवन

‘लम्पी स्कीन’ आजार (Lumpy Skin Disease) हद्दपार करण्यासाठी नगर जिल्हा प्रशासन तत्पर आहे. जिल्ह्यातील ५५२ गावांतील ३ लाख जनावरांचे लसीकरण (lumpy Skin vaccination) करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४७८ जनावरे प्रादुर्भावग्रस्त (Lumpy Infected) आहेत. त्यापैकी २१७ जनावरे बरी झाली आहेत. शासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पशुधनाचा या आजाराने मृत्यू झाल्यास पशुपालकांना जिल्हा नियोजन निधीमधून मदत देण्यात येईल,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

‘लम्पी स्कीन’बाबत पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी शुक्रवारी (ता. १६) संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात या आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. डॉ. भोसले म्हणाले, ‘‘‘लम्पी स्कीन’ आजार लवकर उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या आजाराने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.’’ ‘जिल्हा नियोजन’मधून निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक लस, औषधे, साधनसामुग्री अशा विविध बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी २०२२ २३ मधील उपलब्ध निधीतून १ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

Kharif Crop Loss: पावसाच्या खंडाने खरीप पिके संकटात

e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT